मराठी बातम्या /बातम्या /Viral /फाटक बंद होताना पाहूनही रेल्वे रुळावर गाडी घेऊन गेला अन्...; पाहा घटनेचा थरारक VIDEO

फाटक बंद होताना पाहूनही रेल्वे रुळावर गाडी घेऊन गेला अन्...; पाहा घटनेचा थरारक VIDEO

. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण या व्हिडिओत (Viral Video) दिसणाऱ्या दुचाकीस्वाराचीच सगळी चूक असल्याचं म्हणत आहे. कारण या दुचाकीस्वाराच्या घाईमुळे केवळ गाडीचंच नुकसान झालं नाही तर त्याला स्वतःलाही मार लागला आहे.

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : अती घाई संकटात नेई, असे फलक अनेकदा आपण रस्त्यावरुन प्रवास करताना वाचले असतील. अनेकदा आपल्याला प्रत्यक्षात या गोष्टीचा प्रत्ययही येतो. कारण, घाई अनेकांना अडचणीतच आणते. इन्स्टाग्रामवर (Instagram) याच गोष्टीचा पुरावा देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण या व्हिडिओत (Viral Video) दिसणाऱ्या दुचाकीस्वाराचीच सगळी चूक असल्याचं म्हणत आहे. कारण या दुचाकीस्वाराच्या घाईमुळे केवळ गाडीचंच नुकसान झालं नाही तर त्याला स्वतःलाही मार लागला आहे.

हत्तीनं काही सेकंदातच उपटलं भलंमोठं झाड; गजराजची अफाट ताकद दाखवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये एक रेल्वे फाटक (Level crossing) दिसतं. रेल्वे येणार असल्यानं हे फाटक बंद करण्याचा प्रयत्न गेट मॅन करत आहे. मात्र, लोक घाईघाईत तिथून गाड्या घेऊन जात या व्यक्तीच्या कामात अडथळा आणत असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये एक कार आणि एक दुचाकी फाटक अर्ध्यापर्यंत आल्यानंतर तिथून आपल्या गाड्या काढताना दिसतात आणि ते व्यवस्थितपणे ते पारही करतात, कारण त्यांना पाहून गेट मॅन काही सेकंदासाठी फाटक थांबवतो. मात्र मागून वेगात येणारा दुचाकीस्वार त्यांच्याइतका लकी ठरला नाही. फाटक बंद होताना दिसत असूनही हा व्यक्ती वेगात गाडी चालवत त्याच्या खालून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. यानंतर त्याच्यासोबत भलतंच घडतं.

पोलिसानं आरोपीला दिली आगळीवेगळी शिक्षा; अजब VIDEO पाहून नाही आवरणार हसू

हा व्यक्ती जोरात फाटकाला धडकतो. त्याची गाडी फाटकाच्या खालून घसरून दुसऱ्या बाजूला जाते. तर हा व्यक्ती खांबाला धडकून अलिकडेच पडतो. सुदैवानं व्हिडिओमध्ये (Accident Video) या व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झालेली दिसत नाहीये. हा व्यक्ती लगेचच उठून उभा राहिला. मात्र, ही धडक इतकी जोराची होती की त्याला किती मार लागला याबाबत काही सांगता येणार नाही. सोबतच हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन देण्यात आलं, की याला खूपच घाई आहे. हा व्हिडिओ भरपूर जूना आहे मात्र आता पुन्हा व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत या व्यक्तीचीच चूक असल्याचं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media