Home /News /viral /

पोलिसानं आरोपीला दिली आगळीवेगळी शिक्षा; अजब VIDEO पाहून नाही आवरणार हसू

पोलिसानं आरोपीला दिली आगळीवेगळी शिक्षा; अजब VIDEO पाहून नाही आवरणार हसू

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) दिसतं, की पोलिसानं आरोपीला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं शिक्षा दिली आहे. विशेष बाब म्हणजे ही शिक्षा पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये.

    नवी दिल्ली 24 ऑगस्ट : इंटरनेटवर सतत काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Videos) होत राहतात. यातील काही व्हिडिओ हसवणारे तर काही हैराण करणारे असतात. तर, काही व्हिडिओ विचार करण्यास भाग पाडणारेही असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात पोलिसानं (Police) एका व्यक्तीला दिलेली अजब शिक्षा पाहून सगळेच हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की पोलिसानं आरोपीला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं शिक्षा दिली आहे. विशेष बाब म्हणजे ही शिक्षा पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की रस्त्याच्या कडेला पोलिसानं एका आरोपीला पकडलं आहे. यानंतर पोलीस या आरोपीला आधी हवेत उलटं लटकवतो आणि नंतर जवळच असलेल्या लोखंडाच्या स्टॅण्डवर त्याला आदळतो. VIDEO : मंडपातच नवरीचा गोंधळ; 'ती' इच्छा पूर्ण झाल्याशिवाय लग्न करण्यास नकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. पोलिसानं या व्हिडिओमध्ये आरोपीला ज्याप्रकारे शिक्षा दिली आहे, ती खरंच अनोखी आहे. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, की याआधी मी कधीही एखाद्या पोलिसाला असं काही करताना पाहिलं नाही. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की माझ्यासाठी यापेक्षा मजेशीर काहीही नसेल. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. Bikini घालून बीचवर करत होती योगा; तरुणीसोबत असं काही घडलं की पाहून बसेल धक्का ट्विटरवर हा व्हिडिओ ‘@fred035schultz’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 11 हजारहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर, आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअरही केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Viral video on social media

    पुढील बातम्या