जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हत्तीनं काही सेकंदातच उपटलं भलंमोठं झाड; गजराजची अफाट ताकद दाखवणारा VIDEO

हत्तीनं काही सेकंदातच उपटलं भलंमोठं झाड; गजराजची अफाट ताकद दाखवणारा VIDEO

हत्तीनं काही सेकंदातच उपटलं भलंमोठं झाड; गजराजची अफाट ताकद दाखवणारा VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेला हा व्हिडिओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. यात दिसतं की हत्ती एक झाड भेट मुळापासून पाडतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : हत्तीची अफाट ताकदच त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं बनवत असते. जेव्हा हत्तीला (Elephant) राग येतो तेव्हा ते संपूर्ण जंगलाची नासधूस करून टाकतात. सोशल मीडियावर हत्तीची ताकद दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Elephant) होत असतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हत्ती किती शक्तीशाली असतो याचाच प्रयत्य देणारा हा व्हिडिओ आहे. पोलिसानं आरोपीला दिली आगळीवेगळी शिक्षा; अजब VIDEO पाहून नाही आवरणार हसू सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेला हा व्हिडिओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. यात दिसतं की हत्ती एक झाड थेट पाडतो. सुरुवातीला हत्ती आपल्या सोंडेच्या मदतीनं झाडाच्या फांद्यांना पकडतो आणि नंतर संपूर्ण ताकद लावून तो हे झाड मागे -पुढे ढकलत राहतो. काहीच वेळात हे भलंमोठं झाड रस्त्यावर कोसळतं. यानंतर हत्ती या झाडाचे डहाळे खाऊ लागतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

जाहिरात

पोलिसानं आरोपीला दिली आगळीवेगळी शिक्षा; अजब VIDEO पाहून नाही आवरणार हसू हा व्हिडिओ ट्विटर यूजर @zubinashara नं शेअर केला आहे. सोबत या व्हिडिओला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलंय, ‘आणि खेळ संपला’ हा व्हिडिओ नेटकरी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याबाबतची अद्याप माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरनं म्हटलं, की खरंच हत्तीच्या ताकदीला काही तोड नाही. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं, की हत्तीच्या ताकदीपुढे इतर प्राणी काहीच नाहीत. याच कारणामुळे हत्तीसोबत जंगलात कोणीही दुश्मनी घेत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात