मुंबई 16 ऑक्टोबर : रस्त्यावरून जाताना तुम्ही जेवढे सावध व्हाल तेवढे कमीच आहे. तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच रस्ते अपघाता संदर्भात अनेक व्हिडीओ पाहिले असतीलच. ज्यामध्ये कधी समोरच्याच्या चुकीमुळे तर कधी स्वत: चालकाच्या चुकीमुळे मोठमोठे अपघात झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमचा थरकाप उडेल.
हो, कारण हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे, जो टोलनाक्यावर घडला. एक भरधाव कार अशा काही आली की तिचा ब्रेक लागला नाही आणि ती थेट जाऊन डिवायडरला धडकली. हा अपघात इतका भयानक आणि मोठा होता की गाडीचे तुकडे-तुकडे झाले.
ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, ज्यानंतर हा थरकाप उडवणारा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
या टोल बुथच्या डिव्हायडरला भरधाव वेगात कार धडकते आणि कारचा स्फोट होतो. तसेच या कारमधील एक व्यक्ती कारच्या समोरील खिडकीतून जोरदार बाहेर फेकली जाते आणि ती रस्त्यावर जोरदार धडकते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या अपघाताचे गांभीर्य लक्षात येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही शेवटी कारला आग लागल्याचे पाहू शकता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो कुठला आहे आणि हा अपघात नक्की कुठे घडला हे कळू शकलेलं नाही. तसेच गाडीच्या बाहेर पडलेल्या तरं
Source said he survived but I don't know........ pic.twitter.com/0JutmHz5bw
— Vicious Videos (@ViciousVideos) October 13, 2022
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण अवाक् झाले आहे. हा व्हिडीओ आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे. रस्त्यावरुन केव्हाही सतर्क रहाणे चांगले, तसेच भरधाव वेगाने कधीही गाडी चालवू नये. रस्त्यावरील अशा प्रकारचा निष्काळजीपणा केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या जीवावरही उठू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking accident, Shocking news, Videos viral, Viral