नवी दिल्ली 14 मार्च : मेंढी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. हा पाळीव प्राणी असतो, जो लोकरासोबतच दूध आणि मांस विक्रीसाठी पाळला जातो. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या मेंढ्या पाहायला मिळतात. मात्र फक्त भारतातच जवळपास 40 वेगवेगळ्या प्रकारच्या मेंढ्या आहेत. तर चीनमध्ये ज्याप्रमाणे माणसांची संख्या सर्वाच जास्त आहे, तशीच मेंढ्याची संख्याही सगळ्यात जास्त आढळून येते. गाय आणि म्हशीप्रमाणे मेंढीही शाकाहारी असते आणि गवत तसंच धान्य खाते.
चवताळलेल्या अस्वलाचा ट्रेनरवर हल्ला; सर्कसमध्ये उडाला गोंधळ, Shocking Video
मेंढीदेखील गाई आणि म्हशीप्रमाणेच शांत स्वाभावाची असते, असं म्हटलं जातं. मात्र काही वेळा तिचं रौद्ररूपही पाहायला मिळतं आणि अशावेळी ती समोरच्यावर हल्ला करायलाही मागे-पुढे पाहात नाही. सोशल मीडियावर सध्या मेंढीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका छोट्या मुलीला मेंढीसोबत मस्ती करणं महागात पडल्याचं दिसतं (Sheep Attacks on a Little Girl).
View this post on Instagram
या लहान मुलीला पाहाताच मेंढी चवताळते आणि आपल्या डोक्याने या चिमुकलीवर हल्ला करते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका फार्ममध्ये चार मेंढ्या उभ्या आहेत. एक लहान मुलगी मस्ती करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ जाते. मात्र, हे पाहून त्यांच्यातील एक मेंढी संतापते. ती धावत येते आणि या चिमुकलीला जोरात धडक देते. यामुळे ही चिमुकली काही अंतरावर जाऊन पडते. हा व्हिडिओ अतिशय हैराण करणारा आहे. या चिमुकलीला विनाकारण मेंढीच्या रागाचा सामना करावा लागतो.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ thedaily.animals नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सांगितलं जात आहे, की मेंढीच्या या हल्ल्यात चिमुकलीला काहीही गंभीर दुखापत झालेली नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाख 75 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pet animal, Shocking video viral