जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पक्षाने रस्त्यावर चक्क भरधाव ट्रकसोबत लावली शर्यत; शेवटी काय झालं पाहा, VIDEO

पक्षाने रस्त्यावर चक्क भरधाव ट्रकसोबत लावली शर्यत; शेवटी काय झालं पाहा, VIDEO

पक्षाने रस्त्यावर चक्क भरधाव ट्रकसोबत लावली शर्यत; शेवटी काय झालं पाहा, VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रक वेगात रस्त्यावर धावत आहे. त्याच्यासोबत एक पक्षीही ट्रकप्रमाणेच वेगात त्याच्यासोबत उडत आहे. हे पाहून असं वाटतं जणू दोघांच्यात शर्यत लागली आहे (Bird Race with Truck).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 मार्च : पक्षांचे मंजुळ आवाज तर तुम्ही अनेकदा ऐकले असतील. शहरांमध्ये आजकाल झाडं कमी झाल्याने याचं प्रमाण कमी असलं तरी गावांमध्ये आजही पक्षांच्या आवाजांनीच लोकांचा दिवस सुरू होतो. हा आवाज ऐकून मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते. जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. मात्र यातील कमीच पक्षांबद्दल आपल्याला माहिती असतं. सोशल मीडियावर पक्षांचा निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल (Viral Videos of Birds) झाल्याचं पाहायला मिळतं. खुर्चीवर बसून काम करत होता व्यक्ती; इतक्यात सरपटत आला विषारी साप अन्.., VIDEO या व्हिडिओमध्ये कधी त्यांचा समजदारपणा तर कधी मस्ती पाहायला मिळते. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रक वेगात रस्त्यावर धावत आहे. त्याच्यासोबत एक पक्षीही ट्रकप्रमाणेच वेगात त्याच्यासोबत उडत आहे. हे पाहून असं वाटतं जणू दोघांच्यात शर्यत लागली आहे (Bird Race with Truck).

जाहिरात

ट्रक मशीन असल्याने अगदी वेगात चाललेला आहे. मात्र पक्षी आपल्या पंखांच्या मदतीने उडूनही ट्रकची बरोबरी करत होता. हे पाहून सगळेच हैराण झाले. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, ‘Dhoom4 ची शूटींग सुरू’. अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे. छतावरुन उडी घेतली पण तोल गेला; अनेक फुटांवरुन खाली कोसळला, VIDEO अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. पक्षाचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरत आहे. तुम्हीही कदाचित याआधी कधी पक्षाला रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांसोबत रेस लावताना पाहिलं नसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात