जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चवताळलेल्या अस्वलाचा ट्रेनरवर हल्ला; सर्कसमध्ये उडाला गोंधळ, Shocking Video

चवताळलेल्या अस्वलाचा ट्रेनरवर हल्ला; सर्कसमध्ये उडाला गोंधळ, Shocking Video

चवताळलेल्या अस्वलाचा ट्रेनरवर हल्ला; सर्कसमध्ये उडाला गोंधळ, Shocking Video

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक सर्कस पाहाण्यासाठी हजारो लोक आलेले असतात. अस्वालाची सकर्स पाहाण्यासाठी चारही बाजूंला लोक बसलेले दिसतात. यादरम्यान अस्वल अचानक चवताळतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 मार्च : तुम्ही कधी ना कधी सर्कस पाहायला गेला असाल. सर्कसमध्ये ट्रेनर अस्वल, हत्ती आणि सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांनाही आपल्या इशाऱ्यावर नाचवतो, हे पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर सर्कसमधील एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक अस्वल सर्कस सुरू असताना आपल्या ट्रेनरवरच हल्ला करताना दिसतो (Bear Attacks on Trainer). हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल (Bear Attack Shocking Video). पक्षाने रस्त्यावर चक्क भरधाव ट्रकसोबत लावली शर्यत; शेवटी काय झालं पाहा, VIDEO झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रशियामध्ये एका सर्कसदरम्यान अस्वलाने आपल्या ट्रेनरवर हल्ला केला. समोर आलेल्या माहितीनुसार, अस्वलाला विजेचा धक्का लागलेला होता. यामुळे ते चवताळलं आणि त्याने सर्कस सुरू असतानाच आपल्या ट्रेनरवर हल्ला केला. व्हिडिओमध्ये तुम्ही अस्वलाने केलेला हल्ला पाहू शकता. हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक सर्कस पाहाण्यासाठी हजारो लोक आलेले असतात. अस्वालाची सकर्स पाहाण्यासाठी चारही बाजूंला लोक बसलेले दिसतात. यादरम्यान अस्वल अचानक चवताळतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की अस्वल ट्रेनरच्या चेहऱ्यावरच हल्ला करतं आणि त्याला जखमी करू लागतं. अस्वल आपल्या ट्रेनरवर हल्ला करत त्याला खाली पाडतं. हे दृश्य पाहून सर्कस पाहाण्यासाठी आलेले प्रेक्षकही जोरजोरात ओरडू लागतात. VIDEO: बॉडी बनवण्याची हौस महागात पडली; जिममध्ये तरुणासोबत घडली मोठी दुर्घटना व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की अस्वल अतिशय रागात ट्रेनरवर हल्ला करतं. यानंतर तिथे उपस्थित सर्कस पाहायला आलेले लोक उठून पळू लागतात. तिथे उपस्थित असलेला दुसरा ट्रेनर अस्वलाला पायाने मारून पहिल्या ट्रेनरला त्याच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ naturebeauty8967 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करेला गेला आहे. काहीच तासांआधी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 26 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात