नवी दिल्ली, 07 मे : शार्क (Shark attack) माशाच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचं किंवा मृत्यूमुखी पडल्याचं आपण नेहमीच ऐकतो. परंतु शार्क माशाने एखाद्या बोटीला (Shark attack on boat) आपलं लक्ष्य बनवलं असं आपण कधी ऐकलं नसेल. परंतुअशी एक घटना नुकतीच घडली असून त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अनेक हॉलिवूडपटांमध्ये (Hollywood) शार्कने हल्ला केल्याचे दृश्य आपण पाहिले आहे. अत्यंत चित्तथरारक अशी दृश्ये अनेकदा मनात भय निर्माण करतात. कारण शार्क माशाचा जबडा अत्यंत मोठा आणि भीतीदायक असतो. आपण जशी चित्रपटांमध्ये (Cinema) ही दृश्ये पाहतो, तशा घटना प्रत्यक्षात घडल्याचेही पाहतो किंवा वाचतो. एकदा जर भक्ष्य शार्क माश्याच्या जबड्यात अडकलं तर त्याचा शेवट झालाच म्हणून समजा. अशाच शार्कने बोटीला आपल्या जबड्यात धरलं.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहूनच हैराण व्हाल. अगदी अंगाचा थरकाप उडवेल असं हे दृश्यं.
हे वाचा - VIDEO : मला लग्न करायचं आहे! भलताच हट्ट करत बाबासमोर ढसाढसा रडली चिमुकली लेक
शार्कने बोट जबड्यात धरल्यानंतर पुढे काय घडेल या कल्पनेनंच घाम फुटला आहे. बोट जबड्यात धरून तो संपूर्ण तोंडात घेतो की उलटी करून त्यातल्या प्रवाशांना आपलं भक्ष्य बनवतो, अशी धाकधूक लागून राहते. पण शेवटी थोडा दिलासा मिळतो. बोटीतील प्रवासी शार्कला हाकलण्याचा प्रयत्न करतात. शिवाय बोट काही आपल्या जबड्यात येत नाही, कोणती शिकार आपल्याला सापडत नाही, हे समजून शार्कही माघार घेतो. तो गप्पपणे पुन्हा पाण्यात जातो.
हे वाचा - हा Hollywood चित्रपट नाही, नौदलाचे जवानही आता उड्डाण करू शकणार, पाहा कसे?
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला युझर्सची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. तसंच या व्हिडीओवर अनेक युझर्सने आपल्या कमेंटसही केल्या आहेत. त्यात एक युझर म्हणतो, की हे दृश्य खरोखरच शानदार आहे. परंतु पहिल्यांदा पाहताना मी घाबरुन गेलो. अजून एक युझर यावर कमेंटमध्ये म्हणतो, की हा घाबरवून टाकणारा असा व्हिडीओ आहे. यंदाच्या वर्षातील हा अद्भूत असा व्हिडीओ म्हणता येईल. या व्यतिरिक्त अनेक युझर्सने आपल्या दृष्टीकोनात या व्हिडीओवर कमेंट्स (Comments)केल्या आहेत. युझर्सचा प्रतिसाद बघता हा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish, Viral, Viral videos