मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : मला लग्न करायचं आहे! चिमुकल्या लेकीने केला भलताच हट्ट; बाबासमोर ढसाढसा रडू लागली

VIDEO : मला लग्न करायचं आहे! चिमुकल्या लेकीने केला भलताच हट्ट; बाबासमोर ढसाढसा रडू लागली

चिमुकल्या लेकीचा लग्नाचा हट्ट (Little girl Crying For Marriage) पाहून बाबाही हैराण झाला.

चिमुकल्या लेकीचा लग्नाचा हट्ट (Little girl Crying For Marriage) पाहून बाबाही हैराण झाला.

चिमुकल्या लेकीचा लग्नाचा हट्ट (Little girl Crying For Marriage) पाहून बाबाही हैराण झाला.

मुंबई, 07 मे : बाबा मला खेळणी हवी, बाबा मला कपडे हवे, बाबा मला खाऊ हवा, सामान्यपणे असा हट्ट लहान मुलं आपल्या बाबांकडे करतात. बाबासुद्धा आपल्या लाडक्या मुलांचे असे गोड हट्ट पुरवतात. पण एका चिमुकलीने मात्र बाबांसमोर (Father and daughter video) असा हट्ट केला की तो पुरवायचा तरी कसा याच पेचात तिचा बाबा पडला. या चिमुकलीने चक्क लग्नासाठी हट्ट केला (Little girl Crying For Marriage).

लग्नासाठी बाबांकडे गेलेल्या एका छोट्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आपल्याला लग्न करायचं आहे म्हणून ही चिमुकली परी बाबांसमोर ढसाढसा रडते आहे. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता. ही छोटी मुलगी तिच्या बाबांकडे येते. तेव्हा तिचे बाबा विचारतात की काय हवं आहे तुला, तेव्हा ती चक्क आपल्याला लग्न करायचं आहे, असं म्हणते.

हे वाचा - 'मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे'; पतीसाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी, पाहा VIDEO

तिचा हा विचित्र हट्ट ऐकून तिचे बाबाही हैराण झाले. हा हट्ट पुरवायला ते थेट नकार देतात. तू आता लग्न नाही करू शकत असं सांगतात. तेव्हा चिमुरडी जोरात रडू लागते. तेव्हा बाबा तिला आता लग्न नको करू, लग्नानंतर खूप समस्या होतात, असं काय काय सांगून लेकीला समजवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा काहीच फायदा होत नाही. मुलगी लग्नाचा तगादा धरूनच बसते.

आता आपल्या या लाडक्या चिमुकलीचा हट्ट पुरवायचा तरी कसा, असा प्रश्न या बाबांना पडतो. मग काय ते आपल्या कोर्टातील चेंडू थेट तिच्या आईच्या कोर्टात टाकतात. आईला सांग जा मला लग्न करायचं आहे, असं ते म्हणतात.

हे वाचा - आधी बाप मिठी मारून ढसाढसा रडला आणि नंतर...; कधीच पाहिली नसेल लेकीची अशी पाठवणी

हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही असू आलं असेल. अशाच काही मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहे. काहींनी हा व्हिडीओ खूप क्युट असल्याचं म्हटलं आहे. एका युझरने तर एकदा लग्न करून द्या मग समजेल, असा सल्ला तिच्या पालकांना दिला आहे. तर एकाने बेटा आता तू कमी रडते आहेस, लग्नानंतर जास्त रडायला येईल, असं म्हणते मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

First published:
top videos

    Tags: Funny video, Parents and child, Viral, Viral videos