बॉसचा काटा काढण्यासाठी पठ्ठ्याने ऑफिसमध्ये पाठवला पार्सल बॉम्ब आणि...

बॉसचा काटा काढण्यासाठी पठ्ठ्याने ऑफिसमध्ये पाठवला पार्सल बॉम्ब आणि...

बॉसचा एवढा राग की बदला घेण्यासाठी पाठवला पार्सल बॉम्ब

  • Share this:

जम्मू, 23 जानेवारी : ऑफिसमध्ये बॉस आणि कर्मचारी यांच्यात नेहमीच संघर्षाचे नाते असते. फार कमी वेळा बॉस आणि कर्मचारी यांच्यात चांगले संबंध असतात. मात्र कधी बॉसचा राग आला म्हणून बॉम्ब पाठवल्याचे ऐकले आहे? होय, असा प्रकार घडला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार कुठल्या ऑफिसमध्ये नाही तर सीमा सुरक्षादलात घडला आहे.

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) छावणीत सापडलेल्या पार्सल बॉम्ब प्रकरणी एका जवानाला अटक करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथे राहणाऱ्या समरपालला हुबळी येथून त्याच्या घरी ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली.

वाचा-‘रंगील’ सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स, निवडणूक जिंकताच केला हवेत गोळीबार

का पाठवला होता पार्सल बॉम्ब

जवान समर्थ पालचे आपल्या वरिष्ठांसोबत बाचाबाची झाली होती. त्यामुळं आपल्या बॉसचा बदला घेण्यासाठी या जवानानं 100 ग्रॅमचा आयडी बनवून त्या अधिकाऱ्याच्या नावावर पार्सल पाठवले. जवान आपल्या घराकडे जाण्यापूर्वी छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पार्सल बॉम्ब सोडला होता. परंतु वेळेवर अन्य सैनिकांनी डिस्पोजल पथकाच्या मदतीने ते पार्सल बॉम्ब निष्फळ केले. मुख्य गेटवर बॉम्ब सोडत असताना या जवानाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सांबा पोलिसांनी ओळख पटवून अटक केली.

वाचा-अस्वल आणि 2 वाघांच्या लढाईत कोणी मारली बाजी? थरारक VIDEO पाहून व्हाल हैराण

बॉम्ब स्पेशालिस्ट होता जवान

सूत्रांनी सांगितले की, समरपाल हा स्फोट (बॉम्ब) तज्ज्ञ आहे. त्याने सहाय्यक कमांडेंटचा बदला घेण्यासाठी आयडी तयार केला होता. ते म्हणाले की, जवान आपल्या घराकडे जाण्यापूर्वी बॉम्ब कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारावर पार्सल ठेवून पळाला. सांबाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक शक्ती पाठक म्हणाले, “जवानांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.” सांबा येथील बीएसएफच्या 133व्या बटालियनच्या मुख्यालयात एक पार्सल सापडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

वाचा-दिशा पाटनीचा हॉट अवतार सोशल मीडियावर व्हायरल, पाहा PHOTO

First published: January 23, 2020, 12:59 PM IST
Tags: bomb

ताज्या बातम्या