सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅपने अखेर डार्क मोड फीचर सुरू केलं आहे. व्हॉटस्अॅपचं हे फीचर थिम सिलेक्शन पर्यायात दिसत आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या व्हॉटस्अॅपचा रंग पूर्ण बदलेल. अॅपचा युजर इंटरफेस डार्क ग्रीन रंगात दिसेल. चॅट करताना तुम्हाला बॅकग्राउंडमध्ये हवा असलेला कलर आणि डार्क मोड करता येईल. रात्री अंधारात डोळ्यांना जास्त प्रकाश हानीकारक असतो. अशावेळी डार्क मोड वापरणं फायद्याचं ठरतं.
सध्या व्हॉटस्अॅपने डार्क मोड फीचर बीटा युजर्ससाठी आणलं आहे. ते अॅक्टिवेट करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये बीटा व्हर्जन असणं गरजेचं आहे. डार्क मोट व्हॉटसअॅप बीटाच्या v2.20.13 अपडेटमध्ये देण्यात आलं आहे.
तुम्हीही बीटा युजर असाल तर अपडेटसह हे फीचर मिळेल. तुम्ही बीटा युजर नसलात तरी ते इन्स्टॉल करता येतं. यासाठी तुम्ही WhatsApp beta v2.20.13 APK इंटरनेटवरून डाउनलोड करता येतं. मात्र ते फारसं सुरक्षित नाही. गुगल प्लेमधून तुम्ही बीटा टेस्टर प्रोग्रॅमचे हे व्हर्जन मिळवू शकता. पण सध्या बीटा युजर्सची संख्या फुल्ल असल्याने तुम्हाला वाट बघावी लागेल.
असे अॅक्टिवेट करा डार्क मोड फीचर
व्हॉटस्अॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. त्याच्या टॉपला राइट कॉर्नरवर असलेल्या मेन्यू आयकॉनवर क्लिक करा. त्यानतंर सेटिंगमध्ये जाऊन चॅट हा पर्याय निवडा. त्याठिकाणी Theme पर्याय दिसेल. त्यामधील डार्क मोड सिलेक्ट करताच तुमच्या व्हॉटसअॅपचा रंग बदलेल.
वाचा : फेसबुक वापरताना 'या' चुका केल्यात तर तुमचं अकाउंट होऊ शकतं ब्लॉक!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp