अनिल कुमार (गोरखपूर), 12 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. एका डायरीच्या सहाय्याने पोलिसांनी हत्येचे गूढ खळबळजनकपणे उघड केले आहे. पती दुबईत असल्याने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध होते दरम्यान पती दुबईहून परतताच त्याची हत्या करण्यात आली. त्याला मारून तलावाजवळ टाकण्यात आलं होतं. या हत्या प्रकरणाचा कट त्याच्याच पत्नीने तिच्या प्रियकरासह रचला होता. पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने 6 मार्च रोजी अनैतिक संबंधांमुळे कट रचून आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
खरे तर हे संपूर्ण प्रकरण गोरखपूरच्या मल्हीपूर गावाशी निगडीत आहे. रात्री पत्नीने नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या अनेक गोळ्या घालून त्याला जेवण दिले होते. यामुळे त्याला प्रचंड झोप लागल्याने रात्री एकच्या सुमारास प्रियकर त्याच्या मित्रासह घरात घुसला. यावेळी प्रियकर आणि पत्नी यांनी मिळून पतीची गळा दाबून हत्या केली. नंतर मृतदेह तलावाजवळ फेकण्यात आला.
आपल्या मृत्यूची साक्ष देण्यासाठी ‘मृत महिला’ पोलिस स्टोशनमध्ये, नक्की के प्रकरण तरी काय?या प्रकरणाचा खुलासा करताना एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर म्हणाले की, 7 मार्च रोजी मल्हीपूर, गिडा येथील तलावात तरुणाचा मृतदेह आढळला होता. रामानंद विश्वकर्मा असे व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तरुणाच्या जवळच्या नातेवाईकांना हत्येचा संशय होता.
पोलिसांनी रामानंद यांच्या घराची झडती घेतली असता पत्नीच्या खोलीत एक डायरी सापडली, ज्यामध्ये पत्नीने पतीसोबतच्या बिघडत चाललेल्या संबंधांबद्दल लिहिले होते. यासोबतच डायरीत एक फोटो सापडला, ज्यामध्ये पत्नी सीतांजलीसोबत आणखी एक तरुण होता. पत्नीवर पोलिसांचा संशय बळावला.
यातून पोलिसांनी कडक चौकशी केली असता, यावेळी पत्नीला अश्र अनावर झाले आणि पोलिसांना कबुलीजबाब दिला. यावेळी सीतांजलीने सांगितले की, डिसेंबर 2020 मध्ये माझे रामानंदसोबत लग्न झाले होते. पण आमचे संबंध चांगले नव्हते. रामानंद फेब्रुवारी 2021 मध्ये दुबईला गेले होते.
दरम्यान, माझ्या वहिनीचा मेहुणा ब्रिजमोहन याच्याशी माझे प्रेमसंबंध होते. आम्हा दोघांना एकत्र राहायचे होते, म्हणून दोन महिने अगोदरच आम्ही माझ्या पतीला मार्गातून दूर करण्याचा प्लॅन केला. बृजमोहनने आपल्या मित्रालाही या घटनेत सामिल करून घेतले होते. रामानंद दुबईहून घरी आल्याची माहिती पत्नीने प्रियकराला फोनवरून माहिती दिली. प्रियकराने मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. आणि ज्या दिवशी रामानंद दुबईहून परतला, त्याच रात्री त्यांची हत्या करण्यात आली.