भोपाळ 14 सप्टेंबर : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ (Bhopal) येथील एका पाणीपुरी विक्रेत्याने मुलींना एक ओझं समजणाऱ्यांना मोठा संदेश दिला आहे. कोलर भागात राहणारे आंचल गुप्ता गेल्या 14 वर्षांपासून पाणीपुरीचा गाडा चालवतात. रविवारी आंचल गुप्ता यांनी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांना मोफत पाणीपुरी दिली (Seller Offered Free Pani-Puri to Celebrate Daughter’s Birth). त्यांनी तब्बाल 50 हजार लोकांना मोफत पाणीपुरी दिली. कबुतरांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे ही महिला; वर्षाला खर्च करते लाखो रुपये लोकांना मोफत पाणीपुरी देण्यासाठी त्यांनी पाच तास पाणीपुरीचे 10 स्टॉल लावले होते. एका वडिलांनी अनोख्या पद्धतीनं साजरा केलेला हा आनंद पाहून लोकही यात सहभागी झाले आणि या पाणीपुरी विक्रेत्याचं भरपूर कौतुकही केलं. आंचल गुप्ता यांनी सांगितलं, की त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती की त्यांच्या घरी मुलीचा जन्म व्हावा आणि देवानं त्यांची ही इच्छा पूर्ण केली. 17 ऑगस्टला घरात मुलीचा जन्म झाला. ‘साहेब, मला एकही मुलगी पटत नाही’, GF साठी पठ्ठ्याने थेट आमदारालाच लिहिलं पत्र गुप्ता यांनी आपल्या मुलीचं नाव अनोखी ठेवलं आहे. याच आनंदात त्यांनी हा निर्णय घेतला आणि रविवारी आपल्या दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी मोफत पाणीपुरी दिली. यासाठी त्यांनी दुकानाच्या बाहेर टेंट लावला आणि मोठ्या उत्साहात हा आनंद साजरा करत लोकांना मोफत पाणीपुरी दिली. गुप्ता यांचं असं म्हणणं आहे, की मुलींमुळेच कुटुंब आहे आणि मुली असतील तरच देश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







