मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'साहेब मला एकही मुलगी पटत नाही, तुम्ही...'; गर्लफ्रेंडसाठी पठ्ठ्याने थेट आमदारालाच लिहिलं पत्र

'साहेब मला एकही मुलगी पटत नाही, तुम्ही...'; गर्लफ्रेंडसाठी पठ्ठ्याने थेट आमदारालाच लिहिलं पत्र

File Photo

File Photo

तरुणाने आमदाराकडे मांडली आपली व्यथा.

चंद्रपूर, 13 सप्टेंबर : आपल्याला एक तरी गर्लफ्रेंड (Girlfriend) असावी असं बहुतेक तरुणांना वाटतं. मुलगी पटवण्यासाठी तरुण काय काय नाही करत. पण काही तरुणांना काही केल्या मुलगी पटत नाही. अशाच एका तरुणाने चक्क आमदाराकडेच आपली व्यथा मांडली आहे. गर्लफ्रेंडसाठी तरुणाने आमदारालाच पत्र लिहिलं आहे (Letter to mla for girlfriend).

चंद्रपुरातील (Chandrapur) भूषण जांबुवंत राठोडने त्याचा विधानसभा क्षेत्रातील आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

भूषणने पत्रात म्हटलं आहे, 'माननीय आमदार साहेब संपूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण मला एकही मुलगी पटत नसून ही चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे.  मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर इथं रोज जाणं येणं करतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या डोमड्यांना गर्लफ्रेंड असते, ते  बघून माझा जीव जळून राख होतो'

हे वाचा - प्रेमासाठी सोडली राजगादी; सामान्य मुलाशी लग्न करायचं म्हणून राजकुमारीचा त्याग

'राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहित करायला हवं, आमच्यासारख्यांनासुद्धा भाव देण्यात यावा', अशी विनंती त्याने आमदारांना केली आहे.  तरुणाचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पण आमदार सुभाष धोटे यांनी आपल्याला असं पत्र मिळालं नसल्याचं सांगितलं आहे.

First published:

Tags: Boyfriend, Chandrapur, Girlfriend, Lifestyle, Mla