मुंबई 25 सप्टेंबर : आपल्या आजूबाजूला अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल बऱ्याचदा आपल्याला महिती नसते किंवा किंवा त्याची उत्तर आपल्याजवळ नसतात. लोकांना अशा रहस्यमय गोष्टींबद्दल जाणून घेण्याची खूपच इच्छा असते. असंच काहीसं रहस्यमय प्रकरण समोर आलं आहे, ज्याबद्दल लोकांमध्ये बरीच चर्चा आहे. खरंतर समुद्रात एका जहाजाचे अवशेष सापडले आहेत, विशेष बाब म्हणजे या जहाजातून उत्तम प्रकारे जतन केलेली अनेक प्राचीन भांडीही सापडली आहेत. या भांड्यांमधून सुमारे 1300 वर्षे जुन्या वस्तू सापडल्या आहेत. यांबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. हे जहाज नक्की कुठलं आहे आणि त्यामध्ये सापडेल्या वस्तू काय असतील? कोणत्या असतील? हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. हे जहाज इस्रायलच्या किनाऱ्यावर सापडले. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे जहाज वेगवेगळ्या भूमध्यसागरीय भागातील मालाने भरले होते. सातव्या शतकात इस्लामिक साम्राज्याची स्थापना झाल्यानंतरही या ठिकाणी पाश्चात्य देशांतील लोक व्यापारासाठी येत असत याचा पुरावा या जहाजात त्यांना मिळाला आहे. हे जहाज बुडण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. व्यापाऱ्यांनी भरलेले हे जहाज मॅगन मायकेल या विद्यमान इस्रायली तटीय समुदायाकडून सापडले आहे. हे वाचा : कारखान्याच्या छतावर गोल गोल फिरणारं स्टीलचं भांडं का लावलं जातं? त्यांचं काम काय? वाचा अहवालात असे सांगण्यात आले आहे की, हे जहाज त्या काळातील आहे जेव्हा पूर्व भूमध्यसागरीय भागातून ख्रिश्चन बायझंटाईन साम्राज्य कमी होत होते आणि या भागात इस्लामिक शासक मजबूत होत होते. सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ डेबोरा सिविकेल यांनी सांगितले - हे जहाज 7व्या किंवा 8व्या शतकातील असेल. धार्मिक विभागणी असूनही, तेव्हा या भूमध्यसागरीय भागात व्यापार चालू होता, असे पुरावे आहेत.
डेबोराह म्हणाल्या- सामान्यतः इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असे सांगितले जाते की इस्लामिक राजवटीच्या विस्तारानंतर या भागातील व्यापार ठप्प झाला होता. तेव्हा भूमध्यसागरात आंतरराष्ट्रीय व्यापार नव्हता. पण आता तसे दिसत नाही. डेबोरा म्हणाली - आमच्याकडे एका मोठ्या जहाजाचे मलबे आहे. आम्हाला वाटते की हे जहाज प्रत्यक्षात 25 मीटर लांब असेल. हे वाचा : जगातील अजब-गजब परंपरा, इथे स्वत:च्या मृत्यूसाठी लोक आवडीने करतात शॉपिंग जहाजाजवळ सापडलेल्या कलाकृतींवरून हे जहाज इजिप्तमधील सायप्रसमधून येथे आले असावे किंवा ते तुर्कीचे असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. तो उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून इथे आला असावा. शोधकर्त्यांना या जहाजात 200 मडके सापडल्या आहेत. यामध्ये भूमध्य प्रदेशातील खाद्यपदार्थ जसे की फिश सॉस आणि विविध प्रकारचे ऑलिव्ह, खजूर आणि अंजीर सापडले आहेत. तसेच दोरखंड आणि कंगव्यासारख्या वैयक्तिक वस्तू, तसेच काही प्राण्यांचे अवशेषही ढिगाऱ्यात सापडले आहेत.