मुंबई 25 सप्टेंबर : फोन हा आपल्या आयुष्यात इतका महत्वाचा आहे की आपली सगळी कामं त्याच्यावरच अवलंबून राहातात. म्हणजे अगदी अलार्म लावण्यापासून ते पैसे पाठवणे, फोटो काढणे, व्हिडीओ पाहाणे, मॅप लावणे यांसारखी आपली असंख्य कामं आपण फोनवर करतो. त्यामुळे फोन शिवाय राहाण्याचा आपण स्वप्नात सुद्धा विचार करु शकत नाही. त्यात असा काही वर्ग आहे, ज्यांना फोनचं व्यसनंच लागलं आहे, ज्यामुळे ते प्रत्येक सेकंद फोनवरच असतात आणि फोन शिवाय 1 मिनिटीत देखील ते राहू शकत नाहीत. पण एक अशी बातमी समोर आली आहे, जेथे लोकांना फोनपासून लांब राहावंच लागतं, तेही प्रत्येक दिवशी. हो हे खरं आहे. महाराष्ट्रातील एका गावात हा नियम बनवण्यात आला आहे. आता हे असं का केलं गेलं? याबद्दल तुमच्या मनात नक्की प्रश्न उपस्थीत झाले असतील, चला याबाबत सविस्तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मोहितांचे वडगाव या गावाने आपल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि सोशल मीडियाच्या व्यसनामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे. हे वाचा : समुद्रात सापडले जहाजाचे अवशेष, मडक्यांमध्ये सापडल्या अशा वस्तू, आता ‘या’ रहस्यमयी जहाजाची होतेय चर्चा काही लोकांनी सुरू केलेला डिजिटल डिटॉक्सिंग उपक्रम गावातील प्रत्येक घरात खूप लोकप्रिय आहे, त्याचे प्रत्येक घरात काटेकोरपणे पालन केले जाते. सुमारे 3 हजा 200 लोकसंख्या असलेल्या गावातील मंदिरात दररोज संध्याकाळी 7 वाजता सायरन वाजतो. जे सूचित करते की प्रत्येकाने त्यांचे मोबाईल फोन, टीव्ही आणि इतर गॅझेट वापरणे ताबडतोब बंद केले पाहिजे. मोबाईल आणि टीव्ही बंद करण्याचा हा प्रस्ताव गावचे सरपंच विजय मोहिते यांनी मांडला होता. त्यानंतर इतर लोकांची मदत घेत ही कामगिरी इंटरनेट विश्वात प्रसिद्ध केली. याचा परिणाम असा होतो की, संध्याकाळी ७ वाजता मंदिरातून सायरन वाजताच लोक आपली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करतात. हे वाचा : रेस्टॉरंटमधील बाथरूम वापरण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, हा फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का या ९० मिनिटांत काय होते? यावेळी येथील लोक पुस्तके वाचतात किंवा विचारविनिमय करतात. म्हणजे शाळेत शिकणारी मुलं पुस्तकांमध्ये गुंतून जातात. त्याच वेळी अनेकजण समोरासमोर बसून एखाद्या विषयावर बोलतात. यावेळी ग्रुपमध्ये बसलेले लोक एकमेकांना त्यांच्या मनाची अवस्था सांगतात. या सभेच्या माध्यमातून लोकांचे सुख-दु:खही वाटून घेतले जाते. या मोहिमेनंतर ९० मिनिटांनी म्हणजेच दीड तासानंतर रात्री ८.३० वाजता दुसरा सायरन वाजतो. यानंतर येथील लोक स्वतःच्या इच्छेनुसार मोबाईल आणि टीव्ही चालू करतात. हा नियम कोणी मोडत आहे का, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रभाग समितीही स्थापन करण्यात आली आहे. अशा प्रकारे जनजागृती केली या गावच्या सरपंच मोहिते म्हणाले, ‘स्वातंत्र्यदिनी आम्ही महिलांची ग्रामसभा बोलावली होती. आणि एक सायरन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षकांनी घरोघरी जाऊन डिजिटल डिटॉक्सबाबत जनजागृती केली. यानंतर संपूर्ण गाव या मोहिमेत सहभागी झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.