जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शिफ्ट सुरू होण्याच्या 9 तास आधी दारु प्यायल्याने गेली तरुणीची नोकरी, पण एका निर्णयाने झाली मालामाल

शिफ्ट सुरू होण्याच्या 9 तास आधी दारु प्यायल्याने गेली तरुणीची नोकरी, पण एका निर्णयाने झाली मालामाल

 मद्यपानामुळे थंडी कमी होते, असं यामागचं कारण सांगितलं जातं. परंतु, हिवाळ्यात (Winter) मद्यपान हे घातक ठरू शकतं

मद्यपानामुळे थंडी कमी होते, असं यामागचं कारण सांगितलं जातं. परंतु, हिवाळ्यात (Winter) मद्यपान हे घातक ठरू शकतं

महिलेने तिची कामाची शिफ्ट सुरू होण्यापूर्वी 9 तास आधी दारू प्यायल्याने कंपनीने थेट तिला कामावरुन काढून टाकलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

एडनबर्ग, 16 सप्टेंबर : एका महिलेला कामावरुन काढल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. कंपनीने महिलेला एका कारणामुळे कामावरुन काढून टाकलं आहे. महिलेने तिची कामाची शिफ्ट सुरू होण्यापूर्वी 9 तास आधी दारू प्यायल्याने कंपनीने थेट तिला कामावरुन काढून टाकलं आहे. द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार, मालगोर्जाता क्रोलिक नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली. महिला कर्मचारी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर तिच्या तोंडाला दारुचा वास येत होता. या महिलेची शिफ्ट दुपारी 2 वाजता होती आणि सकाळी 5 वाजता ती दारु प्यायली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे काय नवीन? ट्रॅफिक सिग्नलवर अचानक मॉडेलने सुरू केला डान्स, पाहा VIRAL VIDEO

स्कॉटलँडमधील एडनबर्गमध्ये ही घटना समोर आली आहे. महिला काम करत असलेल्या कंपनीची याबाबत पॉलिसी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्या कंपनीत दारु पिणाऱ्यांबाबत झिरो टॉलरेन्स पॉलिसी आहे. म्हणजेच कर्मचारी त्याची ड्युटी असण्याच्या काळात दारु पिऊ शकत नाही. जर ड्युटीच्या दिवशी एखादा कर्मचारी दारु पिऊन आला, तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाते. ही महिलाही दारु पिऊन फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी आली होती. त्याच कारणामुळे तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं. ही महिला मागील 11 वर्षांपासून या कंपनीत काम करत होती. पण तरीही कंपनीने तिला तडकाफडकी काढून टाकलं.

वर्षभरात SEX न करताच प्रेग्नेंट राहिली तरुणी? पोटदुखीनंतर डॉक्टरांनी दिला धक्कादायक रिपोर्ट

नोकरीवरुन तडकाफडकी काढून टाकल्यामुळे महिलेने थेट कोर्टात धाव घेतली. तिने कंपनीविरोधात केस दाखल केली. न्यायालयाने सुनावणीनंतर महिला कर्मचाऱ्याच्या बाजून निकाल दिला. न्यायालयाने महिला कर्मचाऱ्याला 5000 यूरो जवळपास 4 लाख 33 हजार 204 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात