Home /News /viral /

हे काय नवीन? ट्रॅफिक सिग्नलवर अचानक मॉडेलने सुरू केला डान्स, पाहा VIRAL VIDEO

हे काय नवीन? ट्रॅफिक सिग्नलवर अचानक मॉडेलने सुरू केला डान्स, पाहा VIRAL VIDEO

अचानक एक मॉडेल (Model) तरुणी रस्त्यावर आली आणि तिने चक्क डान्स (Dance) करायला सुरुवात केली.

    इंदूर, 15 सप्टेंबर : चौकातील सिग्नल (Traffic Signal) जेव्हा लाल (Turned red) झाला, तेव्हा सगळी वाहनं (Vehicles) थांबली. त्या क्षणी अचानक एक मॉडेल (Model) तरुणी रस्त्यावर आली आणि तिने चक्क डान्स (Dance) करायला सुरुवात केली. चौकात असणाऱ्या झेब्रा कॉसिंगवर तिनं आपल्या पदलालित्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. प्रवाशांना सरप्राईज ही घटना घडली इंदूरच्या मुख्य चौकात. आपापल्या इच्छित पोहोचण्याच्या घाईगडबडीत असलेल्या प्रवाशांना सुरुवातीला हा काय प्रकार आहे, ते समजायलाच काही क्षण जावे लागले. ट्रॅफिक पोलिसांकडून जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचाच हा एक भाग असावा, असं  सुरुवातीला अनेकांना वाटलं. मात्र वस्तुस्थिती वेगळीच होती. या मॉडेलचा केवळ लोकप्रियता मिळवण्याचा हा प्रयत्न होता, अशी चर्चा त्यानंतर इंदूरमध्ये सुरू झाली. जनजागृतीसाठी डान्स श्रेया नावाच्या मॉडेलनं हा डान्स केल्याचं सर्वांना समजलं आणि बघता बघता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. आपण जनजागृतीसाठी हा डान्स केल्याचं श्रेयानं सांगितलं आहे. सर्वांनी मास्क वापरावा, हा संदेश देण्यासाठी आपण हा डान्स केला असून त्यावेळी आपल्याही चेहऱ्यावर मास्क होता, असं तिनं म्हटलं आहे. अशा सरप्राईजिंग पद्धतीनं दिलेला संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळ त्यांच्या लक्षात राहतो, असं तिनं म्हटलं आहे. शिवाय, आपण वाहतुकीचे कुठलेही नियम न मोडता, सिग्नल रेड झाल्यावरच हा डान्स केला आणि ग्रीन सिग्नल लागण्यापूर्वीच आपण तिथून हटलो, असंही तिनं सांगितलं आहे. हे वाचा - ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट बसखाली आला अन्...; पाहा VIDEO पोलिसांची प्रतिक्रिया संदेश देण्याचा उदेदश चांगला असला तरी वर्दळ असणाऱ्या चौकात सिग्नलवर डान्स करणं ही बाब धोकादायक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. ट्रॅफिक सिग्नलवर कुठल्याही प्रकारे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे अशा ठिकाणी गर्दीच्या वेळी डान्स करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Dance video, Indore, Social media viral

    पुढील बातम्या