मुंबई, 26 फेब्रुवारी : सोशल मीडियावर कधी काय होईल याचा नेम नाही. येथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येत असतात. जे कधी मनोरंजक तर कधी अपघाताचे असतात. असाच एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. हा व्हिडीओ समोर असताना देखील तुम्ही डोळे बंद कराल. खरंतर या व्हिडीओमधील बाईक चालवणारी व्यक्ती हेल्मेट घालून स्कूटीवरुन जात असते. ही व्यक्ती अगदी सामान्य स्पीडमध्ये आपल्या तंदरीत गाडी चालवत असते. हा व्हिडीओ पाहात असताना तुम्ही सुरुवातीला अंदाजा देखील लावू शकणार नाही की या व्यक्तीसोबत पुढे किती भयंकर घडणार आहे. आधी मान कापली, मग हृदय काढलं आणि मग गुप्तांग… सायको आशिकचा विचित्र प्रकार या स्कूटी चालवणाऱ्या व्यक्तीची फक्त एकच चुक होती की त्याने सिग्नल फॉलो केला नाही आणि त्याची त्याला खूपच भयंकर शिक्षा मिळाली. व्हिडीओत अनेक दुचाकी चालक दिसत आहेत. तेव्हा अचानक चार रत्यावर सगळे दुचाकीस्वार थांबतात. पण ही व्यक्ती अगदी कमी स्पीडमध्ये रस्त्यावरुन पुढे जाते आणि अचानक समोरुन वाऱ्याच्या वेगाने एक ट्ऱॉली येते जी या व्यक्तीला गाडीसह अशी काही चिरडते की त्या व्यक्तीचा अक्षरश: चुरा झाला आहे.
ज्या घटनेबद्दल विचार करुनही आपल्या अंगावर काटा आला आहे, पण या चालकाला तर काही कळण्याच्या आताच तो या जगातून निघून गेला. व्हिडीओत पुढे पाहू शकता की रस्त्यावर तुम्हाला ना गाडी दिसत आहे ना व्यक्तीची बॉडी. हा अपघात खूपच भयावह होता.
हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ @ViciousVideos नावाच्या अकाउंटवरुन सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा खरोखरंच हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ आहे.