मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय सांगता! आता टॉयलेटमध्येही असणार कॅमेरे? शास्त्रज्ञांनी सांगितले फायदे

काय सांगता! आता टॉयलेटमध्येही असणार कॅमेरे? शास्त्रज्ञांनी सांगितले फायदे

Toi Labs कडून विकसित करण्यात आलेल्या या स्मार्ट टॉयलेटची खासियत ही आहे, की यातून माणसाच्या पोटासंबंधीच्या आजाराचीही माहिती लगेच मिळते.

Toi Labs कडून विकसित करण्यात आलेल्या या स्मार्ट टॉयलेटची खासियत ही आहे, की यातून माणसाच्या पोटासंबंधीच्या आजाराचीही माहिती लगेच मिळते.

Toi Labs कडून विकसित करण्यात आलेल्या या स्मार्ट टॉयलेटची खासियत ही आहे, की यातून माणसाच्या पोटासंबंधीच्या आजाराचीही माहिती लगेच मिळते.

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : आतापर्यंत तुम्ही बिल़्डिंग, घरं आणि कपाटामध्ये कॅमेरे लावल्याचं ऐकलं असेल. मात्र,एखाद्या टॉयलेटमध्ये कॅमेरा लावल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? मात्र, आता ब्रिटिश शास्त्रज्ञांनी (British Scientists) असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्यामुळे टॉयलेटमध्येही कॅमेरा (Camera Inside Toilet) लावला जाईल. हा कॅमेरा तिथे बसणाऱ्याचे अॅनल प्रिंट घेईल (Unique Anal Print) .

हिरे अन् सोन्यापेक्षाही महाग आहे हे लाकूड; 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल अवाक

आता तुम्ही विचार करत असाल की अशी स्कॅनिंग आणि अशा टॉयलेटची काय गरज आहे? तर हा अनोखा आविष्कार मोठी कामाची गोष्ट आहे. स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनच्या (Stanford School of Medicine) संशोधकांनी म्हटलं आहे, की शौचालय प्रत्येक वापरकर्त्याला त्याच्या अॅनल प्रिंटद्वारे ओळखेल. या कॅमेऱ्याद्वारे ह्यूमन वेस्टचा (Poop Testing) डेटाही जतन केला जाईल, जो तपासासाठी उपयुक्त ठरेल.

अशा प्रकारच्या स्मार्ट टॉयलेटची खासियत ही आहे, की लघवीचा फ्लो आणि व्हॉल्यूमवर यूरोफ्लोमीटरच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल. यासोबतच ह्यूमन वेस्टचा डेटाही सेव्ह होईल. यामुळे स्कॅनिंगच्या तंत्रज्ञानामुळे कॅन्सरसारख्या (Bowel Cancer) गंभीर आजारांची लगेचच माहिती मिळेल. यासोबतच इरिटेबल बावल सिंड्रोम आणि इंफ्लेमेटरी बावल डिसीजबद्दल माहिती मिळण्यासाठीही हे टॉयलेट फायद्याचं ठरेल.

तरुणाच्या पार्श्वभागात झाला ब्लास्ट आणि निघाला धूर; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

Toi Labs कडून विकसित करण्यात आलेल्या या स्मार्ट टॉयलेटची खासियत ही आहे, की यातून माणसाच्या पोटासंबंधीच्या आजाराचीही माहिती लगेच मिळते. ही माहिती रिपोर्टच्या स्वरुपात तयारही केली जाते. गरज भासल्यास हा रिपोर्ट डॉक्टरांना दाखवता येतो. या टॉयलेटचे इतके फायदे असतानाही काही लोकांना ते नकोसं वाटतं. कारण आपली खासगी मेडिकल कंडिशन त्यांना स्कॅन होऊ द्यायची नसते. काही लोकांना ही काळजीदेखील असते की हा डेटा जर इन्शयूरन्स कंपनीच्या हातील लागला तर ते आपल्या पॉलिसीत बदलही करू शकतात. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ लोकांना हे सांगत आहेत, की हा डेटा प्रायव्हेटच राहणार आहे.

First published:
top videos

    Tags: Camera, Viral news