मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! हिरे अन् सोन्यापेक्षाही महाग आहे भारतातील हे लाकूड; 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल अवाक

बापरे! हिरे अन् सोन्यापेक्षाही महाग आहे भारतातील हे लाकूड; 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल अवाक

अगरवूडचं लाकूड जगातील सर्वात दुर्मिळ असून हे सर्वाधिक महाग लाकूड (Most Rare and Expensive Wood in world) आहे. या लाकडाची किंमत हिरे आणि सोन्याच्या किमतीएवढीच आहे.

अगरवूडचं लाकूड जगातील सर्वात दुर्मिळ असून हे सर्वाधिक महाग लाकूड (Most Rare and Expensive Wood in world) आहे. या लाकडाची किंमत हिरे आणि सोन्याच्या किमतीएवढीच आहे.

अगरवूडचं लाकूड जगातील सर्वात दुर्मिळ असून हे सर्वाधिक महाग लाकूड (Most Rare and Expensive Wood in world) आहे. या लाकडाची किंमत हिरे आणि सोन्याच्या किमतीएवढीच आहे.

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : आपण एखाद्याला विचारलं की जगातील सर्वात महागडी वस्तू (Most Expensive Material) काय आहे, तर तो व्यक्ती नक्कीच हिरा (Diamond) किंवा सोनं (Gold) सांगेल. मात्र, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की हिरा आणि सोन्यापेक्षाही महागडं एक लाकूड (Most Expensive Wood) आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? या गोष्टीवर विश्वास ठेवणं थोडं अवघडच आहे. मात्र, खरंच जगातील सर्वात दुर्मिळ लाकडाची किंमत हिरे आणि सोन्यापेक्षाही अधिक आहे. आज आम्ही तुम्हाला याच लाकडाबद्दल सांगणार आहोत.

अक्विलारियाच्या (Aquilaria Tree) झाडापासून मिळणारं लाकूड अगरवूड (Agarwood), ईगलवूड (Eaglewood) किंवा एलोसवूड या नावांनी ओळखलं जातं. हे लाकूड चीन, जपान, भारत, अरब आणि साउथ ईस्ट देशांमध्ये आढळून येतं. अगरवूडचं लाकूड जगातील सर्वात दुर्मिळ असून हे सर्वाधिक महाग लाकूड (Most Rare and Expensive Wood in World) आहे. या लाकडाची किंमत हिरे आणि सोन्याच्या किमतीएवढीच आहे. भारतात एक ग्रॅम हिऱ्याचे दर सध्या 3,25,000 रुपयांच्या आसपास आहेत. तर, 10 ग्रॅम सोन्याचे दर 47,695 रुपये आहेत. मात्र, अगरवूडचं केवळ 1 ग्रॅम लाकूडच 10,000 डॉलर म्हणजेच 7 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीत विकलं जातं.

महिलेला आवडत नव्हतं शरीराचं हे अंग; विचित्र प्रयोग पडला महागात, आता अशी अवस्था

अगरवूडला जपानमध्ये क्यानम किंवा क्यारा नावानंही ओळखलं जातं. या लाकडापासून पर्फ्यूम बनवलं जातं. हे लाकूड सडल्यानंतर त्याचा वापर अत्तर उत्पादनात केला जातो. इतकंच नाही तर या लाकडातून तेलही काढलं जातं. हेच तेल सेंटमध्ये वापरलं जातं. आजच्या घडली या तेलाची किंमत 25 लाख रुपये प्रति किलो इतकी आहे. इतकी किंमत असल्यानं अगरवूडला वूड ऑफ गॉड्स म्हणजेच देवाचं लाकूड म्हटलं जातं.

भारीच आहे! 35 व्या वर्षी 10 कोटींची सेव्हिंग; महिलेची आयडिया पाहून अवाक् व्हाल!

हाँगकाँग, चीन, जपान या भागात ही झाडं भरपूर प्रमाणात आहेत. मात्र, याचं अगरवूड इतकं महाग असल्यानं मोठ्या प्रमाणात ही झाडं तोडून तस्करी केली जाते. बीबीसीच्या अहवालानुसार, या लाकडाची इतकी तस्करी होत आहे की अक्विलारिया वृक्षाची प्रजाती नष्ट केली जात आहे. अहवालानुसार, एशियन प्लांटेशन कॅपिटल कंपनी ही अक्विलारिया झाडांशी संबंधित आशियातील सर्वात मोठी कंपनी आहे. हे झाडांच्या प्रजाती वाचवण्याच्या कामात गुंतले आहे आणि हाँगकाँगसह अनेक देशांमध्ये वृक्षारोपण कार्य केले जात आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Super expensive, Viral news