मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे बापरे! तरुणाच्या पार्श्वभागात झाला ब्लास्ट आणि निघाला धूर; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

अरे बापरे! तरुणाच्या पार्श्वभागात झाला ब्लास्ट आणि निघाला धूर; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

तरुणासोबत असं काही घडलं की तोसुद्धा हादरला.

तरुणासोबत असं काही घडलं की तोसुद्धा हादरला.

तरुणासोबत असं काही घडलं की तोसुद्धा हादरला.

मुंबई, 27 सप्टेंबर :  मित्रमैत्रिणींमध्ये मजामस्ती (Friends video) ही असतेच. पण कधी कधी अशी मजामस्ती करण्याच्या नादात आपण काहीतरी विचित्र किंवा भयंकर करत आहोत याचा विचारही ते करत नाहीत (Friends funny video). असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका मित्राने दुसऱ्या मित्रासोबत मस्करी केली  (Friends prank video). मित्राचा पराक्रम पाहून तरुण अक्षरशः उडालाच (Funny video).

मैत्री म्हणजे पार्टी आलीच. अशीच पार्टी करण्यासाठी काही मित्र जमले होते. एकमेकांसोबत ते गप्पा मारत होते. त्याचवेळी एका तरुणासोबत तिथं असं काही घडतं की त्याला धक्काच बसतो. तो अक्षरशः घाबरतो. व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुरुवातीला धक्का बसेल पण नंतर मात्र हसू आवरणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं या तरुणासोबत नेमकं काय घडलं तर ते तुम्हीच पाहा.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओत पाहू शकता, दोन तरुण सोफ्यावर बसले आहेत आणि त्यांच्यासमोर एक तरुण बसला आहे. तिघं गप्पा मारत असतात. इतक्यात सोफ्यावर धाडकन ब्लास्ट होतो.

हे वाचा - बार्बी डॉलसारखं प्रायव्हेट पार्ट हवं म्हणून तिने स्वतःच्या व्हजायनाची लावली वाट

सोफ्यावर बसलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाच्या खाली हा ब्लास्ट होतो आणि तो उडतोच. ब्लास्ट झाल्यानंतर सोफ्यातून धूर निघतो आणि त्या तरुणाच्या पार्श्वभागातूनसुद्धा. कारण ब्लास्ट होताच तरुणाच्या पार्श्वभागावर हा धूर लागलेला असतो आणि जेव्हा आपण पाहतो तेव्हा जणू त्याच्या पार्श्वभागातूनच धूर निघतो आहे असं वाटतं.

तरुणाला काही क्षण कळतच नाही की नेमकं काय घडलं. तोसुद्धा हादरतो. पण त्याच्यासोबत बसलेला दुसरा तरुणही ब्लास्ट होताच धाडकन उठतो आणि पळतो आणि नंतर मात्र तो आपल्या मित्राची मजा घेत असतो, तो हसताना दिसतो. तर दुसरीकडून एका खोलीतून आणखी दोन तरुण बाहेर येतात आणि तेसुद्धा मोठमोठ्याने हसू लागतात.

हे वाचा - आले अंगावर घेतलं शिंगावर! म्हशींना घाबरून चक्क सिंहांनीही ठोकली धूम; VIDEO VIRAL

एकंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर हा मित्रांनी मित्रासोबत केलेला एक प्रँक होता हे स्पष्ट होतं. hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांना आपल्या मित्रमैत्रिणींचीही आठवण आली आहे.

First published:

Tags: Friendship, Funny video, Viral, Viral videos