जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विद्यार्थ्याची विचित्र हेअरस्टाईल पाहून शाळेनं उचललं कठोर पाऊल; दिली भयंकर शिक्षा

विद्यार्थ्याची विचित्र हेअरस्टाईल पाहून शाळेनं उचललं कठोर पाऊल; दिली भयंकर शिक्षा

विद्यार्थ्याची विचित्र हेअरस्टाईल पाहून शाळेनं उचललं कठोर पाऊल; दिली भयंकर शिक्षा

इंग्लंडमधील हल येथे राहणाऱ्या चार्ली या 14 वर्षीय मुलाला त्याच्या शाळेतील किंग्सवूड अकादमीने अशी शिक्षा दिली की याबद्दल जाणून फक्त मुलगा आणि त्याची आईच नाही तर नेटकरीही चक्रावून गेले

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 29 एप्रिल : मुलांच्या गणवेश आणि कपड्यांबाबत शाळांमध्ये कठोर नियम केले जातात, ज्याचं उल्लंघन कोणीही करू शकत नाही. कधी-कधी मुलं नवीन फॅशनमुळे वेगवेगळ्या प्रकारचे हेअरकट करतात, त्यांच्या गणवेशाला वेगवेगळ्या स्टाइल देण्याचा प्रयत्न करतात, पण असं करणाऱ्यांना शाळेतून शिक्षाही मिळते. अलीकडेच, इंग्लंडमधील एका विद्यार्थ्यासोबत असंच घडलं. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुलाची या प्रकरणात फारशी चूक दिसत नाही (Student Land in Trouble due to Hairstyle). ऐकावं ते नवल! स्वतःचे घाणेरडे, दुर्गंधीयुक्त मोजे विकून लक्षाधीश झाला हा तरुण इंग्लंडमधील हल येथे राहणाऱ्या चार्ली या 14 वर्षीय मुलाला त्याच्या शाळेतील किंग्सवूड अकादमीने अशी शिक्षा दिली की याबद्दल जाणून फक्त मुलगा आणि त्याची आईच नाही तर नेटकरीही चक्रावून गेले. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, चार्लीने अलीकडेच इस्टर ब्रेक दरम्यान विचित्र पद्धतीने कापून घेतले (Student Weird Hairstyle). चार्लीने डोक्याच्या खालच्या भागावरील केस पूर्णपणे काढून टाकले आणि फक्त वरचे ट्रिम केलेले केस ठेवले. या प्रकारच्या हेअरकटला सामान्यतः भारतात मिल्ट्री कट म्हणतात.

News18

चार्ली असा हेअरकट करून शाळेत पोहोचला तेव्हा शाळेतील स्टाफने त्याला ‘अंधारकोठडीत’ बंद केलं. चार्लीची आई सॅम डेयस यांना शाळेकडून फोन गेला आणि त्यांना सांगण्यात आलं की चार्लीचे केस शाळेच्या गणवेशाच्या नियमांशी जुळत नाहीत, त्यामुळे त्याला आयसोलेशनमध्ये म्हणजेच एका खोलीत एकट्याला बंद केलं जाईल. या मुलाचे दोन रंगाचे केस इतर विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित करत असल्याचा आरोप शाळेनं केला होता, त्यामुळे त्याला एका बंद खोलीत असलेल्या बूथमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तिथून त्याला दिवसातून दोनदाच शौचालयात जाण्याची परवानगी होती. गोरं दिसण्यासाठी दर महिन्याला ब्लीचसाठी खर्च करायचा 20 हजार; 10 वर्षांनंतर झाली भयंकर अवस्था आईने सांगितलं की, मुलाला दंड ठोठावणं ठीक आहे, परंतु अशा प्रकारे त्याला वेगळं ठेवणं, हे त्याच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही. शाळेत जाऊन प्रशासनाशी संबंधित लोकांशी चर्चा केली असता, मुलाच्या केसांमुळे इतर विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होत असल्याचं कारणही त्यांनी दिलं. यामुळे मुलाची आई चांगलीच संतापली आहे. मुलाने केसांमध्ये कोणताही वेगळा रंग वापरला नसल्याचं तिने स्पष्ट केलं. मात्र त्याचे केस नीट वाढल्याशिवाय तो शाळेत येऊ शकत नाही, असं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात