Home /News /viral /

ऐकावं ते नवल! स्वतःचे घाणेरडे, दुर्गंधीयुक्त मोजे विकून लक्षाधीश झाला हा तरुण

ऐकावं ते नवल! स्वतःचे घाणेरडे, दुर्गंधीयुक्त मोजे विकून लक्षाधीश झाला हा तरुण

स्वतः वापरलेले मोजे विकून हा तरुण महिन्याला लाखो रुपये आरामात कमावतो आहे.

    मुंबई, 28 एप्रिल : वापरलेले कपडे विकणं हा बिझनेस तसा काही नवा नाही. सेलिब्रिटीही आपले कपडे ऑनलाइन विकतात. आपणही आपले वापरलेले कपडे गरजूंना देतो. पण कुणी कधी वापरलेल्या मोज्यांची विक्री केल्याचं ऐकलं आहे का? तेसुद्धा घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त मोज्यांची? काहीही असे मोजे कोण कशाला विकत घेईल? असंच तुम्ही म्हणाल. पण एक तरुण मात्र आपले असे मोजे विकूनच लक्षाधीश बनला आहे (Man Earns in Lakhs by Selling Used Socks). यूकेच्या चेल्सियामध्ये राहणारा 25 वर्षांचा बिली जो ग्रे वापरलेल्या मोज्यांचा विचित्र बिझनेस करतो आहे. आपले वापरलेले मोजे विकून तो दर महिन्याला लाखो रुपये आरामात कमावतो. काही दिवस तो मोजे वापरतो. त्यानंतर जिप लॉक बॅगमध्ये पॅक करून ग्राहकांना विकतो. बिलीच्या मते, त्याचे मोजे आरामात दोन-तीन हजारांना विकले जातात. एका आठवड्याला 12 मोजे विकले तरी कमीत कमी 12000  आणि जास्तीत जास्त 30000 रुपये त्याला आरामात मिळतात आणि महिन्याला तो एक ते दीड लाख रुपये आरामात कमावतो. मिररच्या रिपोर्टनुसार किती तरी वेळा त्याला काही स्पेशल रिक्वेस्टही आल्या आहेत. ज्यासाठी तो एक्स्ट्रा चार्ज करतो. हे वाचा - VIDEO - फक्त दोरीउड्या मारून घरबसल्या बक्कळ पैसा कमावते ही तरुणी; नोकरीही सोडली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे मोजे कोण घेत असेल आणि तो हा मोजे कुठे विकतो. तर तो ओन्ली फॅन्स या अडल्ड वेबसाईटसाठी काम करतो. वर्षभरापूर्वी त्याने हे काम सुरू केलं. इथं लोक वापरलेले कपडे, मोजे, जिम टॉप, बॉक्सर्स अशा वस्तूंची मागणी करतात. बिलीचे सर्वाधिक ग्राहक हे होमोसेक्शुअल लोक आहेत. ज्यांना त्याचं पेज आवडतं. त्याचे मोजे जितके घाणेरडे, दुर्गंधीयुक्त असतील तितकी त्यांची किंमत जास्त असते. लोकांना पांढऱ्या रंगाचे मोजे जास्त आवडत असल्याचं बिलीने सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या