जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गोरं दिसण्यासाठी दर महिन्याला ब्लीचसाठी खर्च करायचा 20 हजार; 10 वर्षांनंतर झाली भयंकर अवस्था

गोरं दिसण्यासाठी दर महिन्याला ब्लीचसाठी खर्च करायचा 20 हजार; 10 वर्षांनंतर झाली भयंकर अवस्था

गोरं दिसण्यासाठी दर महिन्याला ब्लीचसाठी खर्च करायचा 20 हजार; 10 वर्षांनंतर झाली भयंकर अवस्था

27 वर्षीय डॅनियल मुरेल विल्यम्स याचा जन्म डार्क कॉम्प्लेक्शनसोबत झाला. मात्र त्वचा उजळण्यासाठी त्याने लहानपणापासूनच स्किन लाइटनिंग क्रीम्स लावायला सुरुवात केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 29 एप्रिल : आजच्या काळात गोऱ्या त्वचेला प्राधान्य देणारे बरेच लोक आहेत. गोऱ्या त्वचेसाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. ब्युटी प्रोडक्ट्स व्यतिरिक्त त्वचेवर अनेक प्रकारचे उपचार केले जातात. यासाठी खूप पैसा तर खर्च होतोच, पण अनेकदा त्याचा लोकांच्या त्वचेवरही परिणाम होतो. मात्र याकडे कोणी लक्ष देत नाही. अशा परिस्थितीत काही काळानंतर लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. अशीच एक घटना एका व्यक्तीने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. आपल्या याच चुकीचा त्याला आज पश्चाताप होत आहे. 27 वर्षीय डॅनियल मुरेल विल्यम्स याचा जन्म डार्क कॉम्प्लेक्शनसोबत झाला. मात्र त्वचा उजळण्यासाठी त्याने लहानपणापासूनच स्किन लाइटनिंग क्रीम्स लावायला सुरुवात केली. यामुळे त्याची लाईट शेडमध्ये आली परंतु याचा परिणाम वाईट झाला. त्याचं कौतुक होऊ लागलं होतं. प्रत्येकजण त्याला त्याच्या गोरं होण्याचं रहस्य विचारत असे. डॅनियलने सांगितलं की बरेच लोक आपला रंग गोरा व्हावा यासाठी ब्लीचचा वापर करतात (Bleach for Fair Skin). पण प्रत्यक्षात त्याने चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी ब्लीच करायला सुरुवात केली होती. यामुळे त्याची रंगही उजळू लागला. मात्र आता दहा वर्षांनंतर त्याला आपल्या या निर्णयावर पश्चाताप होत आहे (Effect of Bleach on Skin). लग्न होताच नवरदेवाला ‘जोर का झटका’, भरमंडपात ढसाढसा रडू लागला; VIDEO VIRAL पिंपलमुळेच डॅनियलने वयाच्या १७व्या वर्षापासून ब्लीचिंगला सुरुवात केली. अवघ्या दहा दिवसांतच लोक त्याचं कौतुक करू लागले. आपल्या त्वचेची स्तुती ऐकून डॅनियलला ब्लीचचं वेड लागलं. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. दर महिन्याला तो ब्लीचवर सुमारे वीस हजार रुपये खर्च करत असे. याशिवाय त्याने स्किन व्हाइटिंग सीरम, बॉडी वॉश आणि लोशनदेखील वापरण्यास सुरुवात केली. दर महिन्याला पाण्यासारखे पैसे खर्च केल्यावर, आपली गोरी त्वचा पाहून त्याला खूप आनंद वाटत होता.

News18

एका टीव्ही शोमध्ये दिसलेल्या डॅनियलने सांगितलं की, यासाठी किती पैसे खर्च होत आहेत याची त्याला पर्वा नव्हती. मात्र आपला रंग गोरा होत असल्याचं पाहून त्याला हे सर्व पैसे वसूल होत असल्याचं वाटत होतं. लोक त्याला रहस्य विचारायचे. मात्र काही काळानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या त्वचेचा वरचा थर हळूहळू खराब होऊ लागला आहे. बऱ्याच काळापासून स्किन व्हाइटिंग प्रोडक्ट्स वापरल्यामुळे त्याच्या त्वचेवर वाईट परिणाम झाला होता. नोकरी गेल्यावर महिलेनं घरबसल्या ऑनलाईन सुरू केला हा व्यवसाय; वर्षभरात कमावले लाखो रूपये आता तो लोकांना या उत्पादनांच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूक करत आहे. त्याने सांगितलं की यातील अनेक उत्पादनांमध्ये घातक रसायने असल्याने त्यांची विक्री करणं बेकायदेशीर आहे. अनेक प्रोडक्ट्सच्या दीर्घकाळ वापरामुळे यकृत आणि किडनीवरही परिणाम होतो. त्याने लोकांना आपला आहे तो नैसर्गिक रंग कायम ठेवण्याची विनंती करत, त्याने केलेली ही चूक कोणीही करू नये, असा सल्ला दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात