मुंबई 9 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात कॉमेडी, लग्नाचे, आर्ट आणि सायन्स यासंबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात असे काही लोक आहेत, ज्यांना प्राण्यांचा किंवा वाईल्ड लाईफ संबंधीत व्हिडीओ पाहायला आवडतात. हे व्हिडीओ कधी आपल्याला आश्चर्यचकीत करणारे असतात. तर कधी थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला हसू तर येईल शिवाय त्या व्यक्तीवर दया देखील येईल. समोर आलेला हा व्हिडीओ जंगल फिरायला आलेल्या लोकांचा आहे, ज्यामध्ये एक रागिट बैल असं काही करतो की, तुम्हाला पाहून भिती वाटेल. हे वाचा : कधी पाहिलाय पाण्यावर चालणारा कुत्रा? या जादुई कुत्र्याला पाहूण सगळेच हैराण, पाहा Video याव्हिडीओमध्ये मोकळ्या मैदानात एक व्यक्ती दिसत आहे. ज्याच्या मागे एक रागीट बैल लागला आहे. ही व्यक्ती त्या बैलापासून वाचण्यासाठी इथे तिथे पळू लागली. परंतू त्याचा काही फायदा झाला नाही, या बैलाने त्या व्यक्तीवर हल्ला केला. मैदान मोकळं असल्यामुळे त्या व्यक्तीला कुठेही लपून बसता आलं नाही. अखेर त्याला वाचवण्यासाठी पर्यटनाची एक गाडी त्याच्या जवळ येते. परंतू या गाडीच न बसता ही व्यक्ती गाडीच्या छतावर जाऊन बसते आणि तिथेच पुन्हा एक मोठी चूक करुन बसते. काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खरंतर ही व्यक्ती जेव्हा बैलापासून वाचण्यासाठी गाडीच्या टपावर जाऊन बसते, तेव्हा हा गाडीचालक हळूहळू आपली गाडी वळतो आणि त्यानंतर अचानक गाडी वेगाने पुढे नेतो, ज्यामुळे या व्यक्तीचा तोल बिघडतो आणि ती कारवरुन पुन्हा खाली पडते. पुढे या व्हिडीओमध्ये काय घडलं हे कळू शकलेलं नाही, परंतू जे घडलं ते फारच मनोरंजक होतं. पण हे सगळं घडत असताना या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल, हे तिलाच ठवूक.
हे वाचा : समुद्रामध्ये दिसू लागला आगीचा मोठा भवरा, हे संकेत नक्की काशाचे? Video पाहून घाबरले लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर gieddee नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोकांनी खूपच पसंत केलं आहे. लोकांनी यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.