मराठी बातम्या /बातम्या /Viral /कधी पाहिलाय पाण्यावर चालणारा कुत्रा? या जादुई कुत्र्याला पाहूण सगळेच हैराण, पाहा Video

कधी पाहिलाय पाण्यावर चालणारा कुत्रा? या जादुई कुत्र्याला पाहूण सगळेच हैराण, पाहा Video

सोशल मीडियावर शेअर केलेला कुत्र्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाण्यावर चालताना दिसत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेला कुत्र्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाण्यावर चालताना दिसत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेला कुत्र्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाण्यावर चालताना दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 7 सप्टेंबर : प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी गोंडस आणि पाळीव प्राण्यांचे असतात. तर कधी प्राण्यांच्या शिकारी असतात, जे थरकाप उडवतात. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा खूपच वेगळा आहे. हा व्हिडीओ अद्भुत आहे. जो पाहिल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. हा खूपच सुंदर आणि मनमोहक व्हिडीओ आहे.

वाइल्डलाइफ व्हायरल सीरीज ट्विटरच्या @buitengebieden वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक सुंदर आणि जादुई दृश्य पाहायला मिळेल. हा व्हिडीओ खरोखरंच आश्चर्यचकित करणारा आहे. कारण यामध्ये एक कुत्रा चक्कं पाण्यावर चालताना दिसत आहे आणि तो पाण्यात बुडत देखील नाही.

या व्हिडीओला 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 9000 हून अधिक लोकांनी व्हिडीओ रिट्विट केला आहे.

हे पाहा : Video : लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने घेतला मुलाचा चावा, मालकिणीची प्रतिक्रिया पाहून नेटीझन्सकडून संताप व्यक्त

सोशल मीडियावर शेअर केलेला कुत्र्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाण्यावर चालताना दिसत आहे. त्याची चालण्याची स्टाईल खूप अनोखी आहे, सोबतच त्याला न बुडता पुढे जाताना पाहून लोकांनी त्याला जादुई कुत्रा म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये कुत्र्याच्या आजूबाजूचे दृश्यही खूप सुंदर दिसत आहे.

हा कुत्रा या फोटोमध्ये पूर्ण दिसत नाही. ज्यामुळे तो खरोखरंच एखादी सावली किंवा अद्भूत असल्यासारखा भासत आहे, आकाश देखील रंगीत झाला आहे, तर आजूबाजूला पूर्णपणे शांतता आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ पाहाताना एक वेगळंच वातावरन पूर्ण होत आहे.

हे वाचा : Viral video : महिलेच्या कानात शिरला साप, पिवळ्या सापाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण

आता तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की, आता यामागचं सत्य काय? हा कुत्रा पाण्यावर न बुडता कसा चालू लागला? खरंतर यामागचं खरं कारण समोर आलेलं नाही. परंतू ते पाणी जास्त खोल नसावं असा अंदाजा लावला जात आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Top trending, Video viral