गडाग 30 जुलै: गडाग शहरापासून सुमारे 59 किमी दूर, रॉन तालुक्यातील गडागोली या छोट्याशा खेड्यातील लोकांनी या गावाचं नामकरण सलमान खानच्या (Salman Khan village) नावावरुन केलं आहे. हे नाव अभिनेता म्हणून सलमानच्या वेगळ्या ओळखीसाठी नाही, तर हे नाव यासाठी कारण या गावामध्ये अविवाहित तरुणांची (Village of Unmarried Youth) संख्या गेल्या दहा वर्षांपासून वाढतच आहे. यातील बहुतेकजण हे शेतकरी आहेत. आता ते माजी मंत्री सी सी पाटील आणि स्थानिक आमदारांना आपल्याला बायका शोधून देण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत. मुलीकडचे लोक या पूरग्रस्त गावात (Flood Affected Village) आपल्या मुली देण्यास टाळत असल्यानं बहुतेकांना लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याची स्थिती आहे.
भलतीच हौस! लग्नात नवरीबाईनं घातला 100 किलोचा लेहंगा; VIDEO पाहून चक्रावले नेटकरी
मागील काही वर्षांमध्ये नवीन गावात 500 घरं बांधण्यात आली. मात्र, अजूनही ती पूरग्रस्तांना देण्यात आलेली नाहीत. गावातील मुलांच्या लग्नाचे प्रस्तावही नाकारले जात आहेत, कारण त्यांच्याकडे चांगली घरं नाहीत. ज्या घरांमध्ये ते सध्या राहतात, त्याला खिडक्या आणि दरवाजेही नाहीत. गावातील शेतकऱ्यांकडे जमिनी आहेत. मात्र, सततचा दुष्काळ आणि महापूर यामुळे इथले शेतकरी आर्थिक संकटाचाही सामना करत आहेत.
जिवाची पर्वा न करता तिघांना वाचवण्याासाठी घेतली पुराच्या पाण्यात उडी अन्....
गावाच्या या अवस्थेमुळे इथल्या युवकांना लग्नासाठी नवरीच मिळत नसल्याची स्थिती आहे. मात्र, गावातील मुलींच्या बाबतीत ही स्थिती वेगळी आहे. या गावात 30 ते 40 या वयोगटातील तब्बल 120 युवक अविवाहित आहेत. एका युवकानं म्हटलं, की आजही आम्ही आम्हाला राहाण्यासाठी घरं मिळेल, याची वाट पाहत आहोत. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, की “एक नवीन गाव तयार आहे, पण काही गावकऱ्यांनी पूर्वी स्थलांतर करण्यास नकार दिला आणि आता हा परिसर काटे आणि झुडपांनी भरलेला आहे. आम्ही परिसर स्वच्छ करून आणि काही घरांची दुरुस्तीही करू. ”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Marriage, Viral news