नवी दिल्ली 30 जुलै : आपल्या लग्नाचा (Marriage) दिवस खास बनवण्यासाठी नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) पूर्ण प्रयत्न करत असतात. खरंतर हा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यातील अगदी खास दिवस असतो. त्यामुळे हा दिवस अधिक खास आणि आठवणीत राहणारा ठरावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, अनेकदा नवरी आणि नवरदेव हा दिवस खास बनवण्याच्या नादात असं काही करतात ते चर्चेचा विषय ठरतात. सध्या पाकिस्तानमधील (Pakistan) अशीच एक नवरीबाई चांगलीच चर्चेत आहे.
रेल्वे कर्मचाऱ्याची गाडी घसरली; बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला बघून पत्नीचा तांडव'
आपल्या सर्वांना माहिती आहे, की सध्या लग्नाचा सीझनच सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या अशाच पाकिस्तानी नवरीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यात दिसतं, की नवरीबाईनं अतिशय मोठा आणि आकर्षक असा लाल रंगाचा लेहंगा (Bride Wore A Dress Of 100 KG On Wedding) घातला आहे.
हा लेहंगा टेल डिझाईनमुळे इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, टेल डिझाईन आणि त्याच्यावरील वर्क यामुळे हा लेहंगा कमीतकमी 100 किलो वजनाचा झाला आहे. नवरीचा लेहंगा इतका मोठा आणि लांब होता की त्यानं संपूर्ण स्टेज झाकून घेतलं. इतकंच नाही तर हा लेहंगा पायऱ्यांच्या खालीदेखील गेला.
11पैकी दोघेच बचावले; दरड कोसळल्यानंतर Video शूट करीत तरुणाने सांगितला प्रसंग
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कमेंट करत म्हटलं, की इतका मोठा आणि जड लेहंगा घालून नवरी चालू कशी शकली? तर काहींनी यावर मजेशीर कमेंट करत म्हटलं, की नवरीनं लेहंगा घातला आहे, की लेहंगानं नवरीला घातलं आहे, हेच कळत नाहीये. तर, अनेकांनी ही अजबच हौस असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Video viral, Wedding video