जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लॉकडाऊनचा कंटाळा बघा! बोअर झाला म्हणून 15 कोटी कमवणारा अवलिया झाला डिलिव्हरी बॉय

लॉकडाऊनचा कंटाळा बघा! बोअर झाला म्हणून 15 कोटी कमवणारा अवलिया झाला डिलिव्हरी बॉय

लॉकडाऊनचा कंटाळा बघा! बोअर झाला म्हणून 15 कोटी कमवणारा अवलिया झाला डिलिव्हरी बॉय

लॉकडाऊनचा कंटाळा घालवण्यासाठी 15 कोटींचा मालक रस्त्यावर चालत घरोघरी विकतोय सामान.

  • -MIN READ
  • Last Updated :

मॉस्को, 22 एप्रिल : कोरोनामुळे जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे लोकांना घरूनच काम करावे लागत आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी हा एका महिन्यांहून जास्त झाला आहे. त्यामुळं आता लोकांना हे लॉकडाऊन आणि घरातून काम करणे कंटाळवाणे वाटू लागले आहे. त्यामुळं काही लोकं बाल्कनीमध्ये गिटार वाजवत बसतात, तर काही गाण्यांच्या मैफली रंगवतात. मात्र रशियामध्ये एक अवलिया आपलं काम सोडून डिलिव्हरी बॉय झाला आहे. वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार डिलिव्हरी बॉय झालेला हा मुलगा रशियातील प्रसिद्ध उद्योगपती आहे. या 38 वर्षीय उद्योगपतीचे नाव Sergey Nochovnyy आहे. मुळात सर्जीचा बिझनेस तोट्यात जात असल्यामुळे त्यानं डिलिव्हरी बॉय होण्याचा निर्णय घेतला नसून, त्याला कंटाळा आला म्हणून त्यानं हे काम सुरू केलं आहे. वाचा- लॉकडाऊनमध्ये घरातलं तांदूळ संपलं म्हणून जंगलातून किंग कोब्रा मारून आणला लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्जी घरातून काम करत आहे. दोन आठवड्यानंतर मात्र सर्जीला कंटाळा आला. त्यामुळं त्यानं 20 किमी चालत सामान, अन्न यांची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याला रोज 13 ते 20 डॉलर मिळतात. मुळात सर्जी हे काम पैसे कमवण्यासाठी नाही तर नवा अनुभव मिळवण्यासाठी करत आहे. वाचा- माणुसकीचा पाझर, हात नसलेल्या माकडाला पोलीस अधिकारी भरवतोय केळ, VIDEO VIRAL मुख्य म्हणजे सर्जीची स्वत:ची कंपनी आहे. या कंपनीचा 2 मिलियन डॉलरचा बिझनेस आहे. त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 15 कोटी आहे. सर्जी गेली 12 वर्ष चीनमध्ये राहत होता. मात्र रशियामध्ये व्यवसाय वाढवल्यानंतर तो, मॉस्कोमध्ये आला. सर्जीच्या मते, सामान चालत पोहचवल्यामुळे त्याचा व्यायामही होत आहे. वाचा- पाण्यापासून दारूपर्यंत सगळं फ्री तेही घरपोच! संगीत दिग्दर्शकाची अनोखी सेवा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात