Home /News /viral /

माणुसकीचा पाझर, हात नसलेल्या माकडाला पोलीस अधिकारी भरवतोय केळ, VIDEO VIRAL

माणुसकीचा पाझर, हात नसलेल्या माकडाला पोलीस अधिकारी भरवतोय केळ, VIDEO VIRAL

देवाचं आणखी एक रुप! दोन्ही हात नसलेल्या माकडाला स्वत:च्या हाताने पोलिसानं भरवलं

    मुंबई, 18 एप्रिल : कोरोनाच्या प्रादूर्भावाच्या काळात मेडिकल यंत्रणा, डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र काम करत आहे. माणसांच्या मदतीला देवासारखे धावून येत आहे. लॉकडाऊनच्या या काळात अनेकांना ते आपले देवदूत वाटत आहेत. जिथे माणसांनाच दोनवेळच्या खाण्याचा प्रश्न आहे अशा परिस्थित प्राण्यांना खायला कुठून मिळणार. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हात नसलेल्या माकडाला खाकी वर्दीतील हा देवदूत स्वत:च्या हातानं केळं भरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा अत्यंत भावनिक व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे गरीब लोक आणि प्राण्यांची खाण्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. हे वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत अलीकडेच एका पोलिस कर्मचाऱ्यानं भुकेलेल्या माकडाला केळी खायला दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ ट्विटर यूजर खुशबू सोनीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 28,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर २ हजाराहून अधिक रिट्वीट करण्यात आले आहेत. त्याच वेळी, बर्‍याच लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. हे वाचा-Lockdown 2.0-देशातील 45 टक्के अर्थव्यवस्था 20 एप्रिलपासून होणार रिस्टार्ट
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus, Viral videos

    पुढील बातम्या