ॲम्स्टरडॅम, 15 एप्रिल : कोरोनामुळे जगभरातील सर्वच देशांची परिस्थिती बिकट आहे. परिणामी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्याता आला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तु मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळं लोकं रस्त्यांवर गर्दी करत आहे. हीच गर्दी कमी करण्यासाठी एका संगीत दिग्दर्शकाने चक्क लोकांना मोफत सामान घरपोच देण्याची सेवा सुरू केली आहे.
नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या एका युवकाने लोकांना लॉकडाऊनमध्ये मदत करण्याची सेवा सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका दुकानात लोकांच्या लांबच लांब रांगा पाहिल्या होत्या. हे दुकान होते व्हाइन शॉप. दारू विकत घेण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी पाहून, त्यानं लोकांना घरपोच दारूसह खाण्याचे पदार्थ मोफत देण्याची सोय केली आहे.
वाचा-VIDEO : रस्त्यावर सांडलेलं दूध जेव्हा माणूस आणि कुत्रे एकाचवेळी पितात तेव्हा...
वाचा-Social Distancing यांच्याकडून शिका! मानवालाही लाजवेल असा PHOTO VIRAL
लोकांना ही सेवा पुरवणारा एक संगीत दिग्दर्शक असून आपल्या बॅंडसह तो लोकांना मदत करत आहे. फ्री आयसोलेशल व्हॅन, असे लिहिलेल्या गाडीतून तो सामानाची विक्री करतो. मुख्य म्हणजे हे सामना तो घरपोच आणि विनामुल्य विकतो. गरजू व्यक्तींना त्यानं सॅनिटायझर, पाणी, टॉयलेट पेपर सारख्या वस्तू दिल्या आहेत. नुकत्याच एक मुलाखतीत त्यानं, लोकांना कोरोनाचे गांभीर्य कळत नाही आहे. त्यामुळं ते गर्दी करत आहे. पण जर मला कळत आहे, तर मी त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून मी ही सेवा सुरू केली, असे सांगितले.
View this post on Instagram
वाचा-VIRAL VIDEO : कोळीवाड्यात असं खिडकीतून सुरू आहे Work From Home
हे सामान विकताना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामोरा करावा लागत आहे. काही वेळ त्याच्या व्हॅनसमोर लोकांची गर्दी होते, कधी त्याला पोलीस पकडतात, मात्र अशा परिस्थितीतही त्याने आपली सेवा सुरू ठेवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona