लॉकडाऊनमध्ये घरातलं तांदूळ संपलं म्हणून जंगलातून किंग कोब्रा मारून आणला, पाहा PHOTO

लॉकडाऊनमध्ये घरातलं तांदूळ संपलं म्हणून जंगलातून किंग कोब्रा मारून आणला, पाहा PHOTO

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात घरी खाण्यासाठी तांदूळ उरलेलं नाही. म्हणून आम्ही जंगलात गेलो आणि काही तरी शोधत असताना हे सापडलं.

  • Share this:

इटानगर, 20 एप्रिल : देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 हजारांहून अधिक जणांना कोऱोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान, सोमवार (20 एप्रिल) पासून काही भागात नियम शिथिल करण्यात आले आहे. जिथं कोरोनाचे रुग्ण कमी आहेत त्या भागात काही प्रमाणात व्यवहार सुरू करण्यात येतील. यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तीन लोक 12 फुटांच्या किंग कोब्राला मारून खांद्यावरून नेत असताना दिसत आहे.

अरुणाचलमधील हा व्हिडिओ असून त्यात लोक म्हणतात की, खाण्यासाठी या विषारी सापाला जंगलात मारलं आहे. जेवणासाठी पूर्ण तयारी केली होती. मांस स्वच्छ करण्यासाठी तसंच त्याचे तुकडे करण्यासाठी केळाची पानेही आणली होती असंही म्हटलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यातील एक व्यक्ती म्हणते की, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात घरी खाण्यासाठी तांदूळ उरलेलं नाही. म्हणून आम्ही जंगलात गेलो आणि काही तरी शोधत असताना हे सापडलं.

हे वाचा-ALERT! महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये समोर आले धक्कादायक आकडे, कोरोनाच कहर वाढला

जंगली प्राण्यांची शिकार केल्याबद्दल संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या लोकांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे तिघेही सध्या फरार आहेत. किंग कोब्रा हा एक संरक्षित वन्यजीव आहे. त्याला मारणं गुन्हा आहे. अशा प्रकरणात जामीनही मिळत नाही.

अरुणाचल प्रदेशात दुर्मीळ आणि लुप्त होत असलेल्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. नुकतंच या ठिकाणी एका विषारी सापाच्या नव्या प्रजातीचा संशोधकांनी शोध लावला होता. त्याचं नाव जे के रोलिंग यांच्या काल्पनिक चरित्रावरून सालाजार स्लाइथरीन च्या नावावरून ठेवण्यात आलं होतं.

हे वाचा-...आणि अचानक रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस, CCTV फुटेजनंतर आलं सत्य समोर

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 20, 2020, 10:05 AM IST

ताज्या बातम्या