रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 27 जुलै : रेल्वे स्थानकावर फलाटावरुन चालताना आपण काळजी घ्यायला हवी. रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीत चढताना आणि उतरताना काळजी घेणं जास्त गरजेचं असतं. अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडण्याची भीती असते. गेल्या आठवड्यात मुंबईच्या कांदिवली रेल्वे स्थानकावर अशीच एक दुर्घटना समोर आली होती. एक शालेय विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत रेल्वे फलाटावर मजा मस्ती करत असताना रेल्वे रुळाच्या दिशेला गेला. त्याचा फलाटावरुन तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी पाठीमागून लोकल ट्रेन आली आणि भयानक दुर्घटना घडली. त्या घटनेनंतर आता गोंदिया रेल्वे स्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. पण या दुर्घटनेत सुदैवाने दोन महिलांचे प्राण वाचवण्यात आरपीएफ जवानाला यश आलं आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडणे दोन महिलांच्या जीवावर बेतू शकलं असतं. कारण दोन महिला या धावती ट्रेन पकडत होत्या. यापैकी एक महिला थेट फलाट आणि रेल्वे रुळाच्या मध्याभागी असलेल्या जागेत खाली पडण्याची भीती होती. पण सुदैवाने ती वाचली. तर दुसरी महिला ही आपल्या पतीला पकडून ट्रेनमध्ये चढत होती. पण तीदेखील खाली पडली असती. यावेळी धावत आलेल्या आरपीएफ जवानाने महिलेला वाचवले. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
VIDEO : गोंदिया रेल्वे स्थानकावर भयानक थरार, एक महिली जमिनीवर कोसळली, दुसरी ट्रेनला लटकली, आरपीएफ जवानाच्या धाडसाने वाचले महिलेचे प्राण #cctv #gondia pic.twitter.com/ScJIRnYH2Q
— News18Lokmat (@News18lokmat) July 27, 2022
( मित्रांसोबत मस्ती भोवली, तोल गेला; ट्रेनला धडक, आणि… कांदिवली रेल्वे स्थानकावरचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO ) गोंदिया येथील रेल्वे रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ट्रेन क्रमांक 22815 एर्नाकुलम एक्सप्रेस दुपारी 1.49 वाजता आली आणि 1:52 सुटली. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला प्रवासी स्लीपर कोचमध्ये प्लॅटफॉर्मवर पडली. आणि दुसरी महिला प्रवाशी एस-4 कोचच्या दारात उभ्या असलेल्या पतीची कंबर धरून ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. ती ट्रेनखाली पडत असतांना स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ जवान प्रमोद कुमार यांनी तत्परता दाखवून तातडीने त्या महिलेला सुरक्षितपणे स्वत:कडे खेचले आणि ट्रेनच्या खाली जाण्यास वाचवले.