मराठी बातम्या /बातम्या /Viral /मित्रांसोबत मस्ती भोवली, तोल गेला; ट्रेनला धडक, आणि... कांदिवली रेल्वे स्थानकावरचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

मित्रांसोबत मस्ती भोवली, तोल गेला; ट्रेनला धडक, आणि... कांदिवली रेल्वे स्थानकावरचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

कांदिवली रेल्वे स्थानकावर फलटावर मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला प्रचंड महागात पडलं आहे.

कांदिवली रेल्वे स्थानकावर फलटावर मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला प्रचंड महागात पडलं आहे.

कांदिवली रेल्वे स्थानकावर फलटावर मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला प्रचंड महागात पडलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India

मुंबई, 22 जुलै : मुंबई लोकल ट्रेनवर अनेकांचं प्रेम आहे. अनेकजण या लोकल ट्रेनवर प्रेम करतात. या लोकल ट्रेनच्या माध्यमातून लाखो चाकरमानी कार्यालय ते घरी जाण्यासाठी प्रवास करतात. लोकल ट्रेनमध्ये तुफान गर्दी देखील असते. पण लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकावर जाताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. विशेषत: रेल्वे स्थानक परिसरात, फलाटावर आणि लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर मजामस्ती करु नये. कारण त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे कांदिवली रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली रेल्वे स्थानकावर फलटावर मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला प्रचंड महागात पडलं आहे. संबंधित मुलगा हा शाळकरी मुलगा असल्याची शक्यता आहे. फलटावर मित्रांसोबत मस्ती करताना या मुलाचा रेल्वे रुळावर तोल गेला आणि मागून येणाऱ्या लोकल ट्रेनची त्याला धडक लागली. अतिशय थरारक अशी ही घटना आहे.

कांदिवली रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या दरम्यान दोन मुलं ही फलाटावर मस्ती करतात. यापैकी एका जणाचा तोल फलाटावरुन खाली रेल्वे रुळाच्या दिशेला जातो. विशेष म्हणजे याचवेळी या मुलाच्या पाठीमागून लोकल ट्रेन येते. त्यामुळे या मुलाची रेल्वेला जोरदार धडक लागते. यावेळी मुलाच्या आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसतो. नेमकं काय घडलं ते त्यांना तातडीने समजत नाही. ते त्या मुलाला बघण्याचा प्रयत्न करतात. पण लोकल ट्रेन धावत गेल्याने मुलगा स्पष्टपणे दिसत नाही. अवघ्या क्षणार्धात हे सगळं घडतं.

(सलमान खान पोलीस आयुक्तांच्या भेटीला; 'त्या' धमकीच्या पत्राचा उल्लेख करीत केली मोठी मागणी)

संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. हा सीसीटीव्ही फुटेज काळजाचा थरकाप उडवणाराच आहे. सर्वसामान्यपणे फलाटावर वर्दळ आहे आणि अचानक एक मुलगा मजामस्तीत फलाटाच्या खाली तोल जावून पडतो आणि नेमकं त्याचवेळी त्याच्या पाठीमागून ट्रेन येते. या मुलाला वाचवण्यासाठी मोटरमन किंवा इथर कुणाला कोणतीही संधी मिळत नाही. अतिशय जलद वेगाने हे सगळं घडतं आणि घडीचा खेळ होतो. या घटनेप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

First published:
top videos

    Tags: Cctv, Mumbai, Mumbai local