नवी दिल्ली 06 जानेवारी : रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. गाडीवर बसून व्यक्तीनं कचाकचा चावून खाल्ला जिवंत साप; पुढं जे झालं ते थरकाप उडवणारं, Shocking Video अनेकदा हा प्रयत्न प्रवाशांना चांगलाच महागात पडतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) अधिकाऱ्याने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाचे प्राण वाचवले. रेल्वे मंत्रालयाने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.
बिहार के पूर्णिया में सतर्क आरपीएफ जवान ने चलती ट्रेन में चढ़ने के दौरान हादसे का शिकार हुए यात्री को बचाया। कृपया चलती ट्रेन में चढ़ने/उतरने का प्रयास ना करें। pic.twitter.com/2OWWQRqNae
— Ministry of Railways (@RailMinIndia) January 4, 2023
व्हिडिओ शेअर करताना, भारतीय रेल्वेने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “बिहारच्या पूर्णियामध्ये एका सतर्क आरपीएफ जवानाने चालत्या ट्रेनमध्ये चढताना अपघात झालेल्या प्रवाशाला वाचवलं. कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा/ उतरण्याचा प्रयत्न करू नका.” हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांना पाहिला आहे. लोकांनी या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्याचं कौतुक केलं आहे. Video : याला साहस म्हणावं की आणखी काही? डझनभर लोकांना घेऊन पडला ट्रक आणि… 20 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पुढे व्हिडिओमध्ये असं दिसून येतं, की तो ट्रेन आणि ट्रॅकच्या मध्ये पडतो आणि ट्रेनने त्याला काही फूट अंतर फरफटत नेलं. तेव्हा या वृद्धाचा जीव वाचवण्यासाठी एक आरपीएफ जवान पुढे आला आणि त्याचा हात धरून त्याला बाहेर काढलं. यानंतर चालती ट्रेन काही सेकंदांनी थांबली. एका ट्विटर युजरने लिहिलं की, “शाब्बास! शाब्बास. तुम्ही एका माणसाचा अनमोल जीव वाचवला आहे. मी त्याच ट्रेनमध्ये होतो.”