जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गाडीवर बसून व्यक्तीनं कचाकचा चावून खाल्ला जिवंत साप; पुढं जे झालं ते थरकाप उडवणारं, Shocking Video

गाडीवर बसून व्यक्तीनं कचाकचा चावून खाल्ला जिवंत साप; पुढं जे झालं ते थरकाप उडवणारं, Shocking Video

गाडीवर बसून व्यक्तीनं कचाकचा चावून खाल्ला जिवंत साप; पुढं जे झालं ते थरकाप उडवणारं, Shocking Video

तुम्ही सापाशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ पाहिले असतील, पण हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जिवंत सापाला चावून खाताना दिसतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 06 जानेवारी : सापाचे नाव ऐकलं तरी भल्याभल्यांनाही घाम फुटतो. पृथ्वीवर सापांच्या 3,000 हून अधिक प्रजाती आहेत. यातील सुमारे 600 प्रजाती विषारी आहेत आणि केवळ 200 म्हणजे सात टक्के साप असे आहेत ज्यांचे विष मानवांना मारू शकते. आम्ही हे सगळं तुम्हाला यासाठी सांगत आहोत कारण मानवांमध्येही असे काही लोक आहेत जे सापापेक्षाही जास्त विषारी असू शकतात. नागिणीच्या मृत शरीराजवळ नागाचा पहारा, मुंगसाने प्राण घेतल्यानंतरचा Video समोर ज्या लोकांना सापाच्या विषाची भीती वाटते त्यांना एक व्हायरल व्हिडिओ पाहून धक्का बसेल. तुम्ही सापाशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ पाहिले असतील, पण हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जिवंत सापाला चावून खाताना दिसतो. त्याला पाहून असं वाटतं जणू तो एखादा विषारी जीव नाबी तर कोंबडी खात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाइकवर आरामात बसलेला दिसत आहे. आजूबाजूचे लोक त्याला उभे राहून पाहत आहेत आणि तो अगदी आरामात 3-4 साप हातात घेऊन त्यांना चावून खात आहे. हे दृश्य पाहून लोक स्तब्ध आणि अस्वस्थ दिसत असले तरी त्यांना काही फरक पडत नाही. या व्यक्तीचं हे कृत्य पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की त्याच्या हातात एक साप आहे आणि तो त्याला असं ओरबाडून खात आहे आणि त्याच्यावर विषाचा परिणाम होत नाहीये. Youtuber Ravi Kumar Rao : नाव घेतलं तरी भीती वाटते, तिथले व्हिडिओ तयार करून यू-ट्यूबर कमवतोय लाखो रुपये! हा व्हिडिओ जुनाच असला तरी आता पुन्हा व्हायरल होत आहे. Gulte.com नावाच्या चॅनलवरून हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी तो पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो की - या व्यक्तीचं काय झालं? या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी त्या व्यक्तीला वेडा म्हटलं आहे तर काहींनी सापाच्या विषाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही कारण तो त्याहून अधिक विषारी आहे, असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात