मुंबई 05 जानेवारी : जगात साहसी लोकांची कमी नाही. असे अनेक लोक आहे, ज्यांना जंगलात जाणे, उंचावरुन उड्या मारणे, स्टंटबाजी करणे आवडते. काही असे देखील लोक असतात, ज्यांना आयुष्यात असं काही तरी करायचं असतं की जे करण्याचा विचार सामान्य लोक नाही करु शकत. भारतापेक्षा परदेशातील लोकांना अशी काम करायला जास्त आवडतात. सध्या यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हाला त्यांच्या या परिस्थिवर काय बोलावं हेच सुचणार नाही. हे ही पाहा : Viral Video : हे दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, महिलेचा जीव थोडक्यात बचावला खरंतर दोन डझनपेक्षा जास्त लोक एका मॉन्स्टर गाडीवर बसले होते. नंतर ही गाडी चिखलात घेऊन जाण्यात आली. ही गाडी खरंतर या लोकांना त्या चिखलाची सैर करवणार होती आणि एका रोलरकोस्टर राईडसारखा आनंद घेण्यासाठी लोक या गाडीमध्ये बसले होते. आधी ही गाडी हळूहळू चिखलात गेली. इथपर्यंत सगळं ठिक होतं. पण नंतर ही गाडी आणखी आणखी चिखलात जात गेली आणि एक वेळ अशी आली की ही गाडी थेट उलटी झाली आणि वर बसलेले सगळे लोक चिखलात पडले. डझनभर लोक मृत्यूपासून थोडक्यात बचावले या घटनेतील सगळे लोक ठिक आहेत. मात्र यामुळे किती मोठा गंभीर अपघात होऊ शकला असता, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. लोकांना साहस करायचे होते, मात्र काही सेकंदांनंतर या साहसाचे रूपांतर अपघातात झाले. ट्रक खोलात शिरताच त्याचा बॅलेंस बिघडला आणि त्यानंतर ट्रकच्या वर उभे असलेले डझनभर लोक चिखलात पडले.
व्हिडीओमध्ये पाहिल्यास अर्ध्याहून अधिक लोक चिखलात पडल्याचे कळेल, तर काही जण ट्रकच्या वरून पडण्यापासून स्वत:ला वाचवत होते. चालकही स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की चिखलात पडलेल्या लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी पोहायला सुरुवात केली आणि मग किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न सुरू केला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे हा व्हिडीओ @BornAKang नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला असून तो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.