Home /News /viral /

VIDEO: मंडपात आली पण स्टेजवर चढायलाच तयार नव्हती नवरी; नवरदेवानं केलं असं काही की सगळेच हैराण

VIDEO: मंडपात आली पण स्टेजवर चढायलाच तयार नव्हती नवरी; नवरदेवानं केलं असं काही की सगळेच हैराण

वरमाळेच्या कार्यक्रमाच्या वेळी नवरीबाई मंडपात प्रवेश करते तेव्हा नवरदेव उभा राहून तिच्याकडे बघत राहतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी मंडपात एण्ट्री घेऊन स्टेजच्या जवळ येऊन उभा राहते

  नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) लग्न समारंभातील व्हिडिओ सतत व्हायरल (Wedding Video Viral) होताना दिसतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंतीही मिळते. अनेकदा लग्नाच्या मंडपात अशी काहीतरी घटना घडते की लगेचच निर्णय घ्यावा लागतो, की नेमकं काय करावं. नवरी अनेकदा असं काहीतरी करते, की पाहून नवरदेवही चिंतेत पडतो. लग्नात अनेकदा रुसवे फुगवे आणि वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं की नवरी (Bride) स्टेजवर चढण्याआधीच थांबते. सोशल मीडियावर व्हायरल झाली मांजराची जबरदस्त भांडणं; VIDEO पाहून नाही आवरणार हसू वरमाळेच्या कार्यक्रमाच्या वेळी नवरीबाई मंडपात प्रवेश करते तेव्हा नवरदेव उभा राहून तिच्याकडे बघत राहतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी मंडपात एण्ट्री घेऊन स्टेजच्या जवळ येऊन उभा राहते आणि वाट पाहत हे बघत राहते की नवरदेव काय करेल. नवरदेवही काही वेळासाठी तिच्याकडे बघत उभा राहतो आणि काहीच वेळात तो नवरीच्या जवळ जाऊन उभा राहात तिला उचलून घेतो. इतकंच नाही तर तिला उचलून घेत नवरदेव पायऱ्या चढून स्टेजवरही घेऊन जातो.
  सरप्राईजच्या नादात GF नं करून घेतली स्वतःची अशी अवस्था; ओळखूही शकला नाही BF नवरी आणि नवरदेवाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नवरदेवानं नवरीला उचलून स्टेजवर आणलं. इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच अनेकांनी तो लाईक केला आहे. हा व्हिडिओ अपलोड करताना कॅप्शनमध्ये अनेक हॅश्टॅग दिले गेले आहेत. व्हिडिओला कॅप्शन देत यात लिहिण्यात आलं, वाह क्या बात हैं. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Viral video on social media, Wedding video

  पुढील बातम्या