जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सरप्राईज देण्याच्या नादात गर्लफ्रेंडनं करून घेतली स्वतःची अशी अवस्था; ओळखूही शकला नाही बॉयफ्रेंड

सरप्राईज देण्याच्या नादात गर्लफ्रेंडनं करून घेतली स्वतःची अशी अवस्था; ओळखूही शकला नाही बॉयफ्रेंड

सरप्राईज देण्याच्या नादात गर्लफ्रेंडनं करून घेतली स्वतःची अशी अवस्था; ओळखूही शकला नाही बॉयफ्रेंड

निकीनं आपल्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधील बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी स्वतःच अमेझॉनची डिलिव्हरी घेऊन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : तुम्ही जर अचानक आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) अमेझॉन डिलिव्हरी (Amazon Delivery) देण्यासाठी आपल्या दारात आल्याचं पाहिलं तर नक्कीच हैराण व्हाल. एका वर्षापासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये (Long Distance Relationship) राहणाऱ्या बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडने अचानक सरप्राईज दिलं. त्याला या गोष्टीवर विश्वासही बसला नाही की अमेझॉन डिलिव्हरीसाठी त्याची गर्लफ्रेंड इतक्या दूर आली आहे. हा व्हिडिओ टिकटॉकवर चांगलाच व्हायरल (Tiktok Video) होत आहे. 4.1 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. VIDEO : कधी पाहिलं नसेल असं दृश्य; आईसाठी चार भावांमध्ये सुरूये वाद, शेवटी… मिरर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, एक महिला निकीनं आपल्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधील बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी स्वतःच अमेझॉनची डिलिव्हरी घेऊन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे तिचा बॉयफ्रेंड तिला ओळखूही शकला नाही. निकी आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी शिकागोला पोहोचली. तिथे जात तिनं अमेझॉन कर्मचाऱ्याप्रमाणे गेटअप केला. निकीनं डोक्यावर काळी टोपी, डोळ्यांवर गडद काळे सनग्लास, चेहऱ्यावर काळा मास्क आणि हातात ग्लव्स घातले होते. `ही` मॉडेल 15 कोटींची संपत्ती करणार पाळलेल्या कुत्र्याच्या नावावर या लुकमध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडला पार्सल देण्यासाठी पोहोचली. मात्र, त्यानं तिला ओळखलंच नाही. त्यानं आपलं पार्सल हातात घेऊन सही केली आणि तो आपल्या घरात जाऊ लागला. अचानक त्याचं लक्ष निकीच्या बहिणीकडे गेलं. जी शेजारीच असलेल्या कारच्या मागून हे सगळं रेकॉर्ड करत होती. यानंतर तो हसू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की हा सर्व प्रँक आहे. अखेर निकीनं आपला लूक बदलला. यानंतर तिचा बॉयफ्रेंड हसू लागला आणि लगेचच तिची गळाभेट घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात