• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • स्टेजवरच नवरीनं केलं असं काही की लाजला नवरदेव; कपलचा Romantic Video व्हायरल

स्टेजवरच नवरीनं केलं असं काही की लाजला नवरदेव; कपलचा Romantic Video व्हायरल

व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) स्टेजवर उभा आहेत. यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील इतर लोकही तिथेच उभा आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 04 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंतीदेखील मिळते. अनेकदा हे व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात, तर कधी भावुक करणारे. सध्या नवरी अन् नवरदेवाचा (Bride and Groom Video) असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही काही वेळासाठी इमोशनल व्हाल. लग्नात अनेक अशा प्रथा किंवा परंपरा असतात ज्या आपल्याकडे पाळल्या जातात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओदेखील आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांच्याही असे व्हिडिओ पसंतीस उतरतात. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात नवरदेव आणि नवरीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 'अमरावतीत येताना..'; रिव्हॉलवरचा गैरवापर भोवला, VIDEO VIRAL होताच पोलीस निलंबित व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील इतर लोकही तिथेच उभा आहेत. अशात तरुण अंगठी घालण्याआधी अशी मागणी करतो, की त्याच्या होणाऱ्या पत्नीनं त्याला गुडघ्यावर बसून अंगठी घालावी. यानंतर ही तरुणीही काहीही विचार न करता लगेचच गुडघ्यावर बसते. हे पाहून तिचा होणारा नवराही थक्क होतो आणि जीभ बाहेर काढतो. यानंतर तो लगेचच आपल्या होणाऱ्या नवरीला उभा करतो आणि स्वतः तिच्या समोर बसतो.
  VIDEO - जीवासह लाजही वाचवली! जवानाने आपल्या वर्दीने झाकलं तरुणीचं विवस्त्र शरीर या तरुणाची रिअॅक्शन नेटकऱ्यांच्या भलतीच पसंतीस उतरत आहे. यामुळे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. तर, आणखी एकानं म्हटलं, की हे दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर couplesvidio9828 नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: