नवी दिल्ली 12 जुलै : देशभरात कोरोना (Coronavirus in India) विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोनावर लस (Corona Vaccine) येऊनही प्रसार अद्याप थांबलेला नाही. 1 मेपासून भारतात 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जात आहे. या काळात असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात लोक लस घेण्यासाठी घाबरत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात दिसतं की एक महिला लस घेतना इतकं जोरात ओरडते की तिचा आवाज ऐकूनच आसपासचे लोकही घाबरतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या हा व्हिडिओ (Funny Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. VIDEO: तरुणीनं एक्स बॉयफ्रेंडसाठी ऑर्डर केल्या सणसणीत चापटी, पाहा पुढे काय झालं व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला लस घेण्यासाठी एका खुर्चीवर बसलेली आहे. नर्स इंजेक्शन हातात घेऊन जवळ येताच ही महिला घाबरते. या व्हिडिओमध्ये महिला लसीकरण केंद्रात बसलेली आहे. नर्स इंजेक्शन हातात घेऊन लस देण्यासाठी येताच या महिलेच्या चेहऱ्यावरील रंगच उडतो आणि ती रडू लागते. इंजेक्शन देताच महिला मोठमोठ्या ओरडू आणि रडू लागते. तिची ही अवस्था पाहून लस घेण्यासाठी आलेले इतर लोकही घाबरतात आणि तिच्याकडे पाहू लागतात.
इतका कसला राग? मंडपातच नवरीचं नवरदेवासोबत विचित्र कृत्य, हैराण करणारा VIDEO हा व्हिडिओ tube__indian नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर लोक केवळ हा व्हिडिओ शेअर करत नाहीयेत तर यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे आणि ही महिला कोण आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये.