Home /News /viral /

VIDEO: तरुणीनं एक्स बॉयफ्रेंडसाठी ऑनलाईन ऑर्डर केल्या 2 सणसणीत चापटी, डिलिव्हरी बॉय घरी आला अन्...

VIDEO: तरुणीनं एक्स बॉयफ्रेंडसाठी ऑनलाईन ऑर्डर केल्या 2 सणसणीत चापटी, डिलिव्हरी बॉय घरी आला अन्...

एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसाठी (Ex-boyfriend) दोन सणसणीत चापटी ऑर्डर केल्या. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीजवळ जाऊन त्याच्या दोन्ही गालांवर चापट मारतो.

    नवी दिल्ली 12 जुलै : ऑनलाईन शॉपिंगच्या (Online Shopping) वाढत्या ट्रेंडमुळे आजकाल प्रत्येक वस्तू घरबसल्याच मिळते. ऑनलाईन डिलिव्हरीची सुविधा आता इतकी सहज झाली आहे की एका क्लिकवर सामान तुमच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचतं. आता अनेकजण घरी बसूनच बऱ्याच गोष्टी ऑर्डर (Order) करतात. मात्र, विचार करा की एखाद्या डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) येऊन तुम्हाला थेट चापट मारू लागला तर? सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एक डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. ब्रेकअपनंतर (Breakup) अनेकदा कपल एकमेकांचा बदला घेण्यासाठी विचित्र पद्धतींचा अवलंब करतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसाठी (Ex-boyfriend) दोन सणसणीत चापटी ऑर्डर केल्या. आतापर्यंत तुम्ही घरातील किराणा सामान, कपडे, जेवण, चप्पल अशा गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्याचं पाहिलं असेल, मात्र आता चापटही ऑनलाईन ऑर्डर होऊ लागली आहे. हेच खास गिफ्ट तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडला दिलं. इतका कसला राग? मंडपातच नवरीचं नवरदेवासोबत विचित्र कृत्य, हैराण करणारा VIDEO व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीजवळ जाऊन त्याच्या दोन्ही गालांवर चापट मारतो. डिलिव्हरी बॉयचं हे विचित्र कृत्य पाहून तरुणही बुचकळ्यात पडला. यानंतर डिलिव्हरी बॉय त्याला सांगतो, की त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं त्याच्यासाठी दोन चापटी ऑर्डर केल्या होत्या. यानंतर तो एका स्लिपवर या तरुणाची सहीदेखील घेतो. जाता जाता डिलिव्हरी बॉय या व्यक्तीला हेदेखील सांगतो, की त्याची एक्स गर्लफ्रेंड त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सांगत होती मात्र हे तिच्या बजेटच्या बाहेर होतं. अजब! कधीही भेट न झालेल्या कैद्याच्या प्रेमात पडली तरुणी; तुरुंगातच करणार लग्न हा विनोदी व्हिडिओ आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, की ऑनलाईन डिलिव्हरी सर्व्हिस ट्राय करा. आता काहीही ऑनलाईन डिलिव्हर केलं जाऊ शकतं. हा मजेशीर व्हिडिओ लोकांच्याही पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच नेटकरी यावर प्रतिक्रियाही देत आहेत. खरंच अशा गोष्टीही ऑनलाईन ऑर्डर करता येतात का हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Online shopping, Shocking video viral

    पुढील बातम्या