जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाहुण्यांसमोरच नव्या नवरीचा पतीसोबत रोमान्स; पाहा कपलचा Romantic Video

पाहुण्यांसमोरच नव्या नवरीचा पतीसोबत रोमान्स; पाहा कपलचा Romantic Video

पाहुण्यांसमोरच नव्या नवरीचा पतीसोबत रोमान्स; पाहा कपलचा Romantic Video

हा डान्स व्हिडिओ (Couple Dance Video) नुकतंच लग्न झालेल्या नव्या कपलचा असल्याचं जाणवतं. हे दोघंही हाऊस पार्टीमध्ये पाहुण्यांच्या समोर डान्स करताना दिसत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 ऑगस्ट : काही लोक रोमान्सच्या (Romance) बाबतीत बॉलिवूडच्या रोमँटिक अभिनेत्यांनाही (Bollywood Actor) टक्कर देतात. सोशल मीडियावर अशा कपलचे अनेक व्हिडिओ (Couple Video Viral) उपलब्ध आहेत, ज्यातील पती आणि पत्नीची केमिस्ट्री पाहण्यासारखी असते. यातील काही कपल हे अत्यंत रोमँटिक (Romantic Couple) असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात दिसतं, की नवऱ्याच्या एक कृत्यामुळे नवरीचा चेहरा पाहण्यासारखा होतो. VIDEO: रिमझिम पावसात रस्त्यात वरवधूचा रोमान्स; दोघांनी डोक्यावर शेला धरला आणि… हा डान्स व्हिडिओ (Couple Dance Video) नुकतंच लग्न झालेल्या नव्या कपलचा असल्याचं जाणवतं. हे दोघंही हाऊस पार्टीमध्ये पाहुण्यांच्या समोर डान्स करताना दिसत आहेत. या कपलचं बॉण्डिंग सर्वांचंच मन जिंकत आहे. तिथे उपस्थित असलेले लोक कपलच्या डान्सवर टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. इतक्यात महिलेचा पती असं काही करतो की सगळे त्याच्याकडेच पाहत राहतात.

जाहिरात

VIDEO - या मुंबई पोलिसाच्या डान्सचा जलवा पाहाच; दबंग सलमानही यांच्यासमोर फेल डान्स करतानाच अचानक पतीच्या डोक्यात काहीतरी येतं आणि तो सर्वांसमोरच आपल्या पत्नीला उचलून घेतो. पतीनं असं करताच नवरीबाई लाजते आणि तिथे उपस्थित सर्व लोकं, हातातील काम सोडून या जोडप्याकडे पाहत राहतात. कपलचं इतकं सुंदर बॉण्डिंग पाहून सगळेच आनंदात दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ 66 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी त्यांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात