Home /News /viral /

VIDEO - या मुंबई पोलिसाच्या डान्सचा जलवा एकदा पाहाच; 'दबंग' सलमानही यांच्यासमोर फेल

VIDEO - या मुंबई पोलिसाच्या डान्सचा जलवा एकदा पाहाच; 'दबंग' सलमानही यांच्यासमोर फेल

मुंबई पोलिसाचा डान्सिंग जलवा

मुंबई पोलिसाचा डान्सिंग जलवा

मुंबई पोलिसाचा डान्स एकदा पाहाल तर फेमस हिरोंचाही डान्स विसराल.

  मुंबई, 06 ऑगस्ट : कमरेवरील बेल्टवर हात ठेवून खांदे उडवणं, दबंग फिल्ममध्ये पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानची ही स्टेप खूपच फेमस आहे. पण या मुंबई पोलिसाचा डान्स (Police dance) तुम्ही पाहिला तर दबंग सलमान खानचा तो डान्सही विसराल. या मुंबई पोलिसाच्या  (Mumbai Police) डान्ससमोर  (Mumbai Police Dance) दबंग सलमानही फेल ठरला आहे. सोशल मीडियावर (Social media) मुंबई पोलिसाच्या डान्सचा व्हिडीओ (Mumbaai Police Constable Dance Video) व्हायरल होतो आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे (Mumbai police Amol kamble) यांनी सोशल मीडियावर आपला डान्सचा जलवा दाखवला आहे.
  व्हिडीओत पाहू शकता 'अप्पू राजा' फिल्ममधील 'आया हे राजा' या गाण्यावर अमोल कांबळे डान्स करताना दिसत आहेत.  भन्नाट डान्स केला आहे. डोळ्यावर काळा गॉगल आणि शरीरावर खाकी वर्दी, अशा लूकमध्ये त्यांनी भारी स्वॅग दाखवला आहे. सॉलिड डान्स स्टेप्सही केल्या आहेत. त्यांना एका तरुणानेही साथ दिली आहे. हे वाचा - VIDEO : एक बार पहरा हटा दे...' आजीही स्वतःला आवरू शकली नाही, नातवासोबतच सैराट हा व्हिडीओ अमोल कांबळे यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जिथं त्यांचा हा एकच व्हिडीओ नाही तर त्यांचे असे बरेच डान्स व्हिडीओ आहेत. आपली ड्युटी बजावत अमोल कांबळे आपली डान्सचीही आवड जपताना दिसत आहे. आधी आपली ड्युटी बजावतात आणि त्यानंतर ते आपल्याला मिळालेल्या थोड्याशा वेळात डान्स करूतात.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Mumbai police, Police, Viral, Viral videos

  पुढील बातम्या