मराठी बातम्या /बातम्या /Viral /रिमझिम पावसात रस्त्यातच रंगला वरवधूचा रोमान्स; नवऱ्याने नवरीच्या डोक्यावर शेला धरला आणि... Romantic video

रिमझिम पावसात रस्त्यातच रंगला वरवधूचा रोमान्स; नवऱ्याने नवरीच्या डोक्यावर शेला धरला आणि... Romantic video

पावसात नवरा-नवरीचा रोमँटिक अंदाज

पावसात नवरा-नवरीचा रोमँटिक अंदाज

रिमझिम पाऊस पडू लागताच दिसला नवरा-नवरीचा रोमँटिक अंदाज

मुंबई, 06 ऑगस्ट : पाऊस म्हणजे रोमँटिक (Romantic video) वातावरण. अशा पावसात लग्न असेल आणि नवरा-नवरी दोघंही पावसात भिजत असतील तर... (Monsoon Wedding Video) साहजिकच अशा रोमँटिक वातावरणात कपल एकमेकांसोबत असताना रोमान्स करण्याची संधी कशी सोडतील नाही का? भरपावसात रस्त्यात रोमान्य अशाच नवरा-नवरीचा व्हिडीओ (Bride Groom Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.

मॉन्सून वेडिंगचा हा सुंदर असा व्हिडीओ. ज्यात नवरा-नवरी पावसात भिजत आहे. दोघांनी एकत्र अनुभवलेल्या या पावसाचा आनंद ते पुरेपूर लुटताना दिसत आहेत.

व्हिडीओत पाहू शकता पावसातून नवरा-नवरी चालले आहेत. रिमझिम असा पाऊस पडतो आहे. नवरा-नवरी दोघंही भिजू लागले. नवऱ्याने स्वतःसह आपल्या नवरीलाही पावसाच्या थेंबापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या अंगावरील शेला आपल्या आणि नवरीच्या डोक्यावर धरला.

हे वाचा - VIDEO - नवरदेवाच्या मित्राने दिलं असं गिफ्ट; पाहताच लाजेनं गुलाबी झाली नवरी

नवऱ्याने असं करतातच नवरीसुद्धा लाजली. ती खूप सुंदर हसतानाही दिसत आहे. नवरासुद्धा तिच्याकडे रोमँटिक नजरेने पाहतो. व्हिडीओ पाहून किती रोमँटिक किंवा उफ्फं अशी प्रतिक्रिया आपल्या तोंडातून आल्याशिवाय राहणार नाही. तशाच कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यावर सोशल मीडियावर येत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Romance, Viral, Viral videos