जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नशीब म्हणतात ते हेच का? भरधाव कार येताच... हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात कॅमेरात कैद

नशीब म्हणतात ते हेच का? भरधाव कार येताच... हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात कॅमेरात कैद

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाण्याच्या पाईपने भिंत आणि फरशी धुताना दिसत आहे, तेवढ्यात एक कार येते आणि…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई १३ नोव्हेंबर : अपघात कधीही कोणाला सांगून येत नाहीत. बऱ्याचदा असं होतं की समोरील व्यक्तीच्या चुकीमुळे देखील हे अपघात होतात. ज्यामुळे रस्त्यावर नेहमीच सावधगिरी बाळगणे चांगले. सोशल मीडियावर तुम्ही अपघाताचे व्हिडीओ पाहिले असणार आहे. हे अपघात हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गवावे लागते, तर काही लोकांचं नशीब इतकं चांगलं असतं की, भयानक दुर्घटना घडून देखील त्यांचे प्राण वाचले आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहेत. जो पाहून तुम्ही हे नक्कीच म्हणाल की या व्यक्तीचे नशीब खरोखर खूपच चांगलं आहे. ते पण एकदा नाही, तर या व्यक्तीच्या नशीबाने त्याला दोनदा साथ दिली, ज्यामुळे एकाच अपघातात, व्यक्तीचा दोनदा जीव वाचला आहे. हे ही पाहा : Viral Video: यमराज सुट्टीवर होता वाटतं? तरुणीसोबत जे घडलं, ते पाहून तुम्ही असंच म्हणाल घटना कॅमेऱ्यात कैद या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाण्याच्या पाईपने भिंत आणि फरशी धुताना दिसत आहे. हा व्यक्ती एका कार गॅरेजमध्येच काम करताना दिसत आहे. अचानक एक कार भरधाव वेगात येते आणि मग असे काही घडते ज्याची अपेक्षा करता येत नाही. ही कार इतक्या वेगाने आली की आपल्याला पाहाताना देखील काही लक्षात येत नाही. मग विचार करा की, त्या व्यक्तीची अवस्था काय झाली असावी. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की ही कार त्या व्यक्तीच्या खूपच जवळून जाते आणि जोरात भिंतीला जाऊन धडकते. ही कार जवळपास त्या व्यक्तीला स्पर्श करून भिंतीला धडकली. ती व्यक्ती घाबरून मागे सरकताच वरून एक जड बोर्ड पडतो. असं दोनदा या अपघातातून या व्यक्तीचे प्राण वाचतात. हे ही पाहा : चोराचं नशीब खराब की दुकानदार हुशार? हा Video पाहून तुम्हीच ठरवा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही व्यक्ती किती नशीबवान आहे, हे लक्षात येईलच. हा व्हिडीओ पाहा

जाहिरात

व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 1.8 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये काही लोकांनी याला चमत्कार म्हटले, तर काहींनी देवाचा आशीर्वाद म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात