मुंबई ११ नोव्हेंबर : गाडी चालवताना नेहमीच काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. ट्राफीक पोलीस देखील यासंदर्भात जागृकता निर्माण करत असते. तसेच यासंबंधी अनेक व्हिडीओ देखील आपल्या समोर आले आहेत. जे आपल्यासमोर उदाहरण ठेवतात. एवढंच काय तर रस्त्याने चालताना देखील लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सोशल मीडिया वर देखील यासंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहाताना तुम्ही श्वास रोखून पाहाल. तुम्ही पाहिलं असेल की असे काही लोक आहेत जे बाईक आणि स्कूटी चालवताना खूप निष्काळजी असतात आणि रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन करताना अजिबात विचार करत नाहीत. मग ते सिग्नल तोडणे असू देत किंवा मग चुकीच्या बाजूने वाहन चालवणे असो. लोक कसलाच विचार करत नाहीत. हे ही पाहा : Viral : मालगाडी खाली अडकली व्यक्ती, जीवन मरणाचा संघर्ष व्हिडीओत कैद अशा परिस्थितीत एक छोटीशी चूक कोणाचाही जीव घेऊ शकते. यामुळे लोक स्वत:चा तर जीव गमावतात. पण कधी कधी अशा प्रकरणात लोकांचा देखील जीव जातो. असाच काहीसा प्रकार एका तरुणीसोबत घडला. ही तरुणी ट्राफीकमधून गाडी चालवत होती, तेव्हा तिची एक चुक तिला महागात पडते. कारण एक ट्रक तिच्या गाडीला चुरडून तिच्यावरुन जातो. ही घटना इतकी धोकादायक आहे की पाहाताना तुम्हाला वाटेल की आता या तरुणीचं काही खरं नाही. पण ट्रक जसा पुढे जातो, तशी ती तरुणी उठून उभी राहाते. पाहा : https://www.instagram.com/reel/ChSU65Zlw2f/?igshid=MDJmNzVkMjY= या तरुणीचं नशीब इतकं चांगलं होतं की तिला काहीही इजा झाली नाही. पण तिच्या गाडीचं मात्र खूपच नुकसान झालं आहे. रस्त्याने स्कूटी चालवणारी तरुणी कशाचीही पर्वा न करता एका मोठ्या ट्रकसमोर येऊन उभी राहिली. मात्र, ट्रकचालकाला याची माहिती नसल्याने तो देखील सरळ पुढे येतो. ज्यामुळे ही तरुणी ट्रक खाली जाते. ही तरुणी खूप नशीबवान होती की तिची स्कूटी ट्रकखाली आली, मात्र ती ट्रकच्या टायरमध्ये अडकली नाही आणि सुखरूप बचावली. या घटनेदरम्यान या तरुणीला एक ही ओरखडा आला नाही. मरणाच्या दारातून बाहेर आल्यानंतर मागून येणारे वाहन तिला चिरडून टाकू नये म्हणून ही मुलगी तिच्या जागेवरून पळून दुसऱ्या बाजूला गेली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर kwamevision नावाच्या अकाउंटने अपलोड केला आहे. नेटीझन्सना हा व्हिडीओ शेअर केला आहे, तर अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.