एप्रिल 2019 मध्ये 26 वर्षीय रोजेल एगुइलेरा कोलोराडोमध्ये लाकडे घेऊन आपल्या 18 चाकाच्या ट्रकने चालला होता.. मात्र अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रक समोरच असलेल्या एका कारला धडकला
नवी दिल्ली 01 जानेवारी : रस्त्यावरील अपघातात (Road Accident) अनेकदा लोक स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. अपघात झाल्यावर एक चालक समोरच्यावर तर समोरचा दुसऱ्यावर आरोप करतो आणि दोघंही एकमेकांच्या चुका दाखवू लागतात. मात्र अनेकदा हे अपघात इतके भयंकर असतात की त्याच्याबद्दल ऐकूनही थरकाप उडतो. अशीच एक घटना साल 2019 साली अमेरिकेत घडली होती. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनेतील गुन्हेगाराला झालेली शिक्षा घटवण्यात आली आहे (Sentence Reduced by 100 Years in America).
एकाच आईच्या पोटात वाढूनही जुळ्या बाळांनी 2 वेगवेगळ्या गर्भाशयातून घेतला जन्म
एप्रिल 2019 मध्ये 26 वर्षीय रोजेल एगुइलेरा कोलोराडोमध्ये लाकडे घेऊन आपल्या 18 चाकाच्या ट्रकने चालला होता.. मात्र अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रक समोरच असलेल्या एका कारला धडकला. या घटनेत एकापाठोपाठ एक अनेक कारला आग लागली. यात चार जणांचा मृत्यू झाला आणि रस्त्याचंही मोठं नुकसान झालं.
त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात एक प्रकरणांमध्ये तो दोषी आढळला. तेव्हा रोजेलने कोर्टात रडत म्हटलं होतं की जेव्हा मी माझ्यावरील आरोप पाहतो, तेव्हा असं वाटतं जणू एखाद्या हत्याऱ्याबद्दल बोललं जात आहे. जो मी अजिबातही नाही. मी कधीही असा विचार केला नव्हता की माझ्यामुळे एखाद्याचा जीव जाईल. यानंतर त्याला 110 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली (110 Year Sentence for Road Accident). यानंतर याला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विरोध झाला.
दोन दिवसाआधी म्हणजेच 30 डिसेंबर 2021 ला कोलोराडोच्या गव्हर्नरने वाढता दबाव आणि आंदोलनांमुळे अतिशय आश्चर्यचकीत करणारं काम केलं. त्यांनी या व्यक्तीची शिक्षा १-२ नाही तर १०० वर्ष कमी केली. आता तो 30 डिसेंबर 2026 नंतरच पॅरोलवर बाहेर येऊ शकतो.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.