जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आई पुढे पिल्लू मागे; पिल्लाला रस्ता ओलांडायला शिकवणाऱ्या गेंड्याचा VIDEO पाहा

आई पुढे पिल्लू मागे; पिल्लाला रस्ता ओलांडायला शिकवणाऱ्या गेंड्याचा VIDEO पाहा

आई पुढे पिल्लू मागे; पिल्लाला रस्ता ओलांडायला शिकवणाऱ्या गेंड्याचा VIDEO पाहा

आपल्या पिल्लासह रस्ता ओलांडणाऱ्या गेंड्याचा (Rhino) व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कंचनजुरी, 09 जुलै : आपण माणसं आईचं बोट हातात धरून चालायला शिकतो, आपण हळूहळू आपल्या पायावर उभं राहून चालायला लागल्यावर रस्ता ओलांडतानाही आई आपला हात अगदी घट्ट धरते, असंच काहीसं हे दृश्यं. माणूस असो किंवा प्राणी आई ती शेवटी आईच. अशीच एक आई आपल्या पिल्लाला रस्ता ओलांडायला शिकवते आहे. त्यावेळी आपल्या पिल्लाला काही होणार नाही याची खबरदारीही ती घेते आहे. आपल्या पिल्लासह रस्ता ओलांडणाऱ्या गेंड्याचा (rhino) व्हिडीओ समोर आला आहे. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील (Kaziranga National Park) हे दृश्य आहे. या नॅशनल पार्कच्या मध्ये एक हायवे आहे. या हायवेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाणारे हे गेंडे. एक गेंडा मादी आपल्या पिल्लासह रस्ता ओलांडते.

जाहिरात

गेंड्याचं हे पिल्लू अवघ्या काही महिन्यांचंच आहे. कदाचित ते पहिल्यांदाच रस्ता ओलांडत असावं. त्यामुळे रस्ता ओलांडताना त्याचं आजूबाजूला अजिबात लक्ष नाही तर आपल्या आईच्या पावलांवर लक्ष आहे. आपली आई जशी चालते तसं तिच्या मागे मागे हे पिल्लू चालतं आहे. आपण भलीमोठं वाहनं जाणारा मोठा रस्ता ओलांडत आहोत याची कल्पनाही त्या पिल्लाला नाही. हे वाचा -  माकडही करतंय कोरोनापासून आपला बचाव; MASK घालून फिरतानाचा VIDEO VIRAL दोघंही रस्त्याच्या पलीकडे जातात आणि थोड्या वेळानं पिल्लू पुन्हा रस्त्यावर येतं. या गेंड्याला रस्ता ओलांडताना पाहून रस्त्यावर पाठीमागे काही गाड्यादेखील उभ्या आहेत. जेव्हा पिल्लू पुन्हा रस्त्यावर जातं तेव्हा त्याच्या आईचं या गाड्यांकडे लक्ष जातं आणि ती पुन्हा रस्त्यावर आपल्या पिल्ल्याच्या आड येते आणि पिल्लाला रस्त्यावरून रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न करतं. नंतर पिल्लू रस्त्यावरून बाजूला होतं. तसं त्याची आईदेखील रस्त्यावरून बाजूला होते. हे वाचा -  भयानक! कार चालवताना ब्रेकजवळ बसला होता सगळ्यात विषारी साप, पुढे झालं असं… आसाममध्ये नुकत्याच आलेल्या पुराचा 80% फटका या नॅशनल पार्कला बसला. त्यामुळे इथल्या प्राण्यांना हायवेच्या पलीकडील भागात स्थलांतरित व्हावं लागलं. जसं पाणी ओसरलं तसे हे प्राणी पुन्हा परतू लागलेत. 38 प्राण्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 18 प्राण्यांना हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना वेगवान गाडीची धडक बसली. जवळपास 670 गाड्यांनी नॅशनल पार्कमधील हायवेवरून जाताना वेग मर्यादा ओलांडली आणि अशाच अपघातापासून ही आई आपल्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: video
  • First Published :
जाहिरात
जाहिरात